कोपरगावात जिल्हास्तरीय तलवारबाजी निवड चाचणी स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:36 IST2021-02-06T04:36:42+5:302021-02-06T04:36:42+5:30
कोपरगाव : महाराष्ट्र राज्य तलवारबाजी असोसिएशनच्या वतीने वरिष्ठ गट राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी नगर ...

कोपरगावात जिल्हास्तरीय तलवारबाजी निवड चाचणी स्पर्धा
कोपरगाव : महाराष्ट्र राज्य तलवारबाजी असोसिएशनच्या वतीने वरिष्ठ गट राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी नगर जिल्ह्याचा मुलांमुलींचा संघ निवडण्यात येणार आहे. ही जिल्हा निवड चाचणी स्पर्धा रविवारी ७ फेब्रुवारीला कोपरगाव शहरातील श्रीमान गोकुळचंदजी विद्यालय येथे घेण्यात येणार आहे.
यासाठी खेळाडूंनी १० वाजता आपली उपस्थिती द्यावी. या स्पर्धेसाठी खेळाडूंनी येतांना स्वतःचे संपूर्ण साहित्य सफेद गणवेश असणे आवश्यक आहे. वरिष्ठ गट राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धा संपूर्णपणे इलेक्ट्रॉनिक साहित्यावर घेण्यात येतील. त्यासाठी संपूर्णपणे इलेक्ट्रॉनिक साहित्य असणे अनिवार्य आहे याची खेळाडूंनी नोंद घ्यावी, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष दिलीप घोडके, श्री. गो. विद्यालयाचे मुख्याध्यापक मकरंद कोऱ्हाळकर यांनी दिली. निवड समिती सदस्य म्हणून नीलेश बडजाते, प्रा.संदेश भागवत, सुनील गोडळकर, प्रा.आकाश लकारे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.