जिल्हा सहकारी बॅंक: शिवाजी कर्डिले, अंबादास पिसाळ विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 09:51 IST2021-02-21T09:50:31+5:302021-02-21T09:51:12+5:30

अहमदनगर : जिल्हा सहकारी बॅकेच्या चार जागांची मतमोजणी झाली असून सर्वांचे लक्ष लागलेल्या जागेवर माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले निवडून आले आहेत. विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातून शिवाजी कर्डिल, उदय शेळके, विजय पिसाळ निवडून आले आहेत.

District Co-operative Bank: Shivaji Kardile, Ambadas Pisal won | जिल्हा सहकारी बॅंक: शिवाजी कर्डिले, अंबादास पिसाळ विजयी

जिल्हा सहकारी बॅंक: शिवाजी कर्डिले, अंबादास पिसाळ विजयी

अहमदनगर : जिल्हा सहकारी बॅकेच्या चार जागांची मतमोजणी झाली असून सर्वांचे लक्ष लागलेल्या जागेवर माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले निवडून आले आहेत. विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातून शिवाजी कर्डिल, उदय शेळके, विजय पिसाळ निवडून आले आहेत.

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या नगर विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातून शिवाजीराव कर्डिले 94 मतांनी विजयी झाले आहेत.तर पारनेर तालुक्यातून उदय शेळके हे 99 मतांनी विजयी झाले आहेत. कर्जत तालुक्यातून अंबादास पिसाळ यांना 37 तर मीनाक्षी साळुंके यांना 36 मते पडली आहेत. निकालानंतर जिल्हा बँकेच्या आवारात उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. बिगर शेती मतदारसंघातून राष्ट्रवादीचे प्रशांत गायकवाड हे पहिल्या फेरीअखेर एकशे दहा मतांनी आघाडीवर आहेत. प्रशांत गायकवाड गायकवाड यांना 387 तर दत्ता पानसरे यांना 273 मते मिळाली आहेत.

Web Title: District Co-operative Bank: Shivaji Kardile, Ambadas Pisal won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.