जिल्हा बँक धोक्यात, ती वाचवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:41 IST2021-02-05T06:41:35+5:302021-02-05T06:41:35+5:30
....... थोरात यांचे बँकेकडे लक्ष नाही मंत्री बाळासाहेब थोरात हे मोठे नेते आहेत. मात्र, त्यांचे जिल्हा बँकेकडे लक्ष नाही. ...

जिल्हा बँक धोक्यात, ती वाचवा
.......
थोरात यांचे बँकेकडे लक्ष नाही
मंत्री बाळासाहेब थोरात हे मोठे नेते आहेत. मात्र, त्यांचे जिल्हा बँकेकडे लक्ष नाही. त्यामुळे त्यांनी यात लक्ष घालावे, तसेच पक्षीय राजकारणविरहित बँक सांभाळणारे सक्षम उमेदवार व बँक सांभाळणारा सक्षम अध्यक्ष द्यावा, तरच बँकेचे भवितव्य टिकेल, अशी स्पष्ट भावना गडाख यांनी बोलून दाखवली आहे. नोकर भरती, कारखान्यांचे कर्ज वाटप, खेळते भांडवल, नावाने दिलेले कर्ज आदी अनेक मुद्यांवरून बँक चर्चेत आली. बँकेच्या काही संचालकांनीच याबाबत वेळोवेळी टीका केली. मात्र, त्यावर थोरात यांनी आजवर भाष्य केलेले नाही. त्या पार्श्वभूमीवर गडाख यांचे हे वक्तव्य लक्षवेधी मानले जाते.
......
केवळ ‘लोकमत’चा पाठपुरावा
बँकेच्या नोकर भरतीत घोटाळा झाला व न्यायालयाच्या निर्णयाचा गैरफायदा घेऊन ही भरती नियमित करण्यात आली. ही बाब ‘लोकमत’ने पुराव्यांसह मांडली. अण्णा हजारेंसह अनेकांनी या घोटाळ्याबाबत लेखी तक्रारी केल्या व पुढे पाठपुरावा सोडून दिला. सहकार आयुक्त अनिल कवडे, विभागीय सहनिबंधक ज्योती लाठकर या अधिकाऱ्यांनी या प्रकरणात केवळ बघ्याची भूमिका घेतली. जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची मुदतवाढ नियमबाह्य आहे, ही बाबही ‘लोकमत’ने उजेडात आणली होती. त्यावर आता उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली असून, संचालक मंडळावर कारवाई करण्याची मागणी झाली आहे.