सारोळा सोमवंशी येथे व्हिटॅमिन गोळ्या, सॅनिटायझरचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:22 IST2021-05-08T04:22:11+5:302021-05-08T04:22:11+5:30

विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील सारोळा सोमवंशी येथे युवा उद्योजक फिरोज सय्यद यांनी गावातील सर्व नागरिकांना वैयक्तिक खर्चातून व्हिटॅमिन गोळ्या ...

Distribution of Vitamin Pills and Sanitizers at Sarola Somvanshi | सारोळा सोमवंशी येथे व्हिटॅमिन गोळ्या, सॅनिटायझरचे वाटप

सारोळा सोमवंशी येथे व्हिटॅमिन गोळ्या, सॅनिटायझरचे वाटप

विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील सारोळा सोमवंशी येथे युवा उद्योजक फिरोज सय्यद यांनी गावातील सर्व नागरिकांना वैयक्तिक खर्चातून व्हिटॅमिन गोळ्या व सॅनिटायझरचे वाटप केले.

नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी सामाजिक कार्यकर्ते राहुल आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील सर्व नागरिकांना व्हिटॅमिन गोळ्या व सॅनिटायझरचे वाटप करण्याचा विचार फिरोजभाई सय्यद यांच्या मनात आला. त्यामुळे रमजानच्या पवित्र महिन्यात स्वखर्चातून त्यांनी हा उपक्रम राबविला आहे. सारोळा सोमवंशी येथील बहुतांश ज्येष्ठ नागरिकांना अद्याप कोरोना लसीचा पहिला डोस मिळालेला नाही. त्यामुळे आरोग्य विभागाने सारोळा सोमवंशी येथे लसीकरण मोहीम राबवावी, याबाबत सरपंच उज्ज्वला आढाव यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर यांच्याकडे मागणी केली आहे; मात्र अद्याप आरोग्य विभागाने लसीकरण मोहीम राबविलेली नाही.

Web Title: Distribution of Vitamin Pills and Sanitizers at Sarola Somvanshi