खासदार विखेंकडून तीनशे रेमडेसिविरचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:22 IST2021-04-20T04:22:22+5:302021-04-20T04:22:22+5:30

खासदार विखे सोमवारी स्वत: विळद घाट येथे विखे पाटील रुग्णालयात तळ ठोकून होते. तेथे अनेक रुग्णांच्या नातेवाइकांनी त्यांच्याभोवती गर्दी ...

Distribution of three hundred remedicivir from MP Vikhen | खासदार विखेंकडून तीनशे रेमडेसिविरचे वाटप

खासदार विखेंकडून तीनशे रेमडेसिविरचे वाटप

खासदार विखे सोमवारी स्वत: विळद घाट येथे विखे पाटील रुग्णालयात तळ ठोकून होते. तेथे अनेक रुग्णांच्या नातेवाइकांनी त्यांच्याभोवती गर्दी केली होती. या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना त्यांनी इंजेक्शन उपलब्ध करून दिले आहेत. मात्र, जिल्ह्यातून मागणी वाढत असल्याने शिर्डी हॉस्पिटल, तसेच जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या अनेक रुग्णांनाही त्यांनी इंजेक्शन उपलब्ध करून दिले. जिल्हा रुग्णालयासाठी ते शंभर इंजेक्शन मोफत उपलब्ध करून देणार आहेत. जास्तीत जास्त इंजेक्शन उपलब्ध करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.

............

रुग्णांचे हाल पाहवत नाहीत. सोमवारी सुमारे तीनशे इंजेक्शन रुग्णांपर्यंत पोहोचवली आहेत. विखे फाउंडेशनमधील रुग्णांसह जिल्ह्यातील इतरही दवाखान्यांपर्यंत मदत पोहोचविण्याचा आपला प्रयत्न आहे.

- डॉ. सुजय विखे, खासदार

Web Title: Distribution of three hundred remedicivir from MP Vikhen