रोटरीकडून महिलांना शिलाई मशीनचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:21 IST2021-07-29T04:21:35+5:302021-07-29T04:21:35+5:30

अहमदनगर : कोरोनामुळे ज्या कुटुंबातील करता माणूस गेला आहे, अशा कुटुंबातील गरजू महिलांना रोटरी क्लबच्या वतीने शिलाई मशीनचे वाटप ...

Distribution of sewing machines to women from Rotary | रोटरीकडून महिलांना शिलाई मशीनचे वाटप

रोटरीकडून महिलांना शिलाई मशीनचे वाटप

अहमदनगर : कोरोनामुळे ज्या कुटुंबातील करता माणूस गेला आहे, अशा कुटुंबातील गरजू महिलांना रोटरी क्लबच्या वतीने शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.

रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रशांत बोगावत व माजी अध्यक्ष ॲड. अमित बोरकर यांच्या वतीने पारनेर तालुक्यातील पाडळी रांजणगाव येथील महिलांना उपजीविकेसाठी शिलाई मशीन देण्यात आले. यावेळी क्लबचे सचिव पुरुषोत्तम जाधव, डॉ. तनपुरे, डॉ. दादासाहेब करंजुले, सरपंच विक्रमसिंह कळमकर व ग्रामस्थ उपस्थित होते. रोटरी क्लबच्या वतीने या ठिकाणी विविध बहुपयोगी झाडांचे रोपण करण्यात आले.

रोटरी क्लबचे अध्यक्ष बोगावत म्हणाले, कोरोनामुळे आलेल्या आपत्तीत अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. अनेक कुटुंबातील कर्तापुरुष गेल्याने कुटुंब उघड्यावर आली आहेत. अशा परिस्थितीत रोटरी क्लब अहमदनगरच्या माध्यमातून अशा विविध भागातील कुटुंबांतील महिला भगिनींना उदरनिर्वाहासाठी शिलाई मशीन दिल्या आहेत.

..

सूचना फोटो आहे.

Web Title: Distribution of sewing machines to women from Rotary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.