पाडळी रांजणगाव येथे शिलाई मशीन वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:16 IST2021-07-16T04:16:10+5:302021-07-16T04:16:10+5:30

पळवे : पाडळी रांजणगाव (ता.पारनेर) येथे सरपंच विक्रमसिंह कळमकर व उपसरपंच वैशाली करंजुले यांच्या शिफारशीनुसार गावचे सुपुत्र तथा ...

Distribution of sewing machines at Padli Ranjangaon | पाडळी रांजणगाव येथे शिलाई मशीन वाटप

पाडळी रांजणगाव येथे शिलाई मशीन वाटप

पळवे : पाडळी रांजणगाव (ता.पारनेर) येथे सरपंच विक्रमसिंह कळमकर व उपसरपंच वैशाली करंजुले यांच्या शिफारशीनुसार गावचे सुपुत्र तथा रोटरी क्लबचे सहाय्यक प्रांतपाल प्रा. डॉ. दादासाहेब करंजुले यांच्या पुढाकारातून रोटरी क्लब ऑफ अहमदनगर या संस्थेने गावातील माया रोकडे-उबाळे यांना एक शिलाई मशीन दिली. गावात वृक्ष लागवडीस प्रारंभ करण्यात आला. अध्यक्षस्थानी पारनेर तालुका राष्ट्रवादी युवकाध्यक्ष तथा पाडळी रांजणगावचे सरपंच विक्रमसिंह कळमकर होते. या कार्यक्रमाला रोटरी क्लब नगरचे अध्यक्ष प्रशांत बोगावत, माजी अध्यक्ष अमित बोरकर, सचिव पुरुषोत्तम जाधव, सदस्य डॉ. विजयसिंह तनपुरे, माजी अध्यक्ष तथा सहाय्यक प्रांतपाल डॉ. दादासाहेब करंजुले, युवा नेते डी. बी. करंजुले, तंटामुक्ती अध्यक्ष आप्पासाहेब साठे, जेष्ठ नेते सुभाष पाटील, विठ्ठलराव साठे, रोहिदास करंजुले, अरुण उबाळे, किरण साठे, ग्रा.पं. सदस्य संगम साठे, सुरेश उबाळे, अशोक जाधव, कामगार तलाठी संतोष मांडगे आदी उपस्थित होते.

Web Title: Distribution of sewing machines at Padli Ranjangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.