काष्टीतील भिल्ल समाजातील ३१ कुटुंबांना रेशनकार्ड वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:26 IST2021-09-17T04:26:48+5:302021-09-17T04:26:48+5:30
काष्टी : काष्टी येथील भिल्ल समाजातील ३१ कुटुंबांना रेशनकार्डचे वाटप प्रांताधिकारी स्वाती दाभाडे, तहसीलदार चारूशीला पवार, उपसरपंच सुनील पाचपुते ...

काष्टीतील भिल्ल समाजातील ३१ कुटुंबांना रेशनकार्ड वाटप
काष्टी : काष्टी येथील भिल्ल समाजातील ३१ कुटुंबांना रेशनकार्डचे वाटप प्रांताधिकारी स्वाती दाभाडे, तहसीलदार चारूशीला पवार, उपसरपंच सुनील पाचपुते यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन श्रीगोंदा येथील महामानव बाबा आमटे संस्थेच्या पुढाकाराने करण्यात आले होते.
महामानव बाबा आमटे संस्थेने भिल्ल समाजातील नागरिकांना मायेचे छत आणि पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. जातीचे दाखले मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहे. त्यामुळे भविष्यात या कुटुंबांच्या घरकुलाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. प्रांताधिकारी स्वाती दाभाडे, तहसीलदार चारूशीला पवार यांनी महिलांशी संवाद साधताना मुलांना शाळा शिकवा आरोग्याची काळजी घ्या, असा सल्ला दिला.
प्रास्ताविक महामानव बाबा आमटे संस्थेचे अध्यक्ष अनंत झेंडे यांनी केले. यावेळी लालासाहेब फाळके, चांगदेव पाचपुते, नवनाथ राहिंज, बाळासाहेब दांगट, विकास पाटील, बन्सी पाचपुते, मंडळ अधिकारी ढवळे, तलाठी पोटे, शुभांगी झेंडे, राऊत आदी उपस्थित होते.
----
१६ काष्टी
काष्टी येथे भिल्ल समाजातील ३१ कुटुंबांना रेशन कार्ड वाटप करण्यात आले.