ग्रामीण रुग्णालयास मास्क, सॅनिटायझरचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:20 IST2021-05-19T04:20:16+5:302021-05-19T04:20:16+5:30

शिर्डी येथील इयत्ता दहावीत शिकणारा साईश विनोद गोंदकर याच्या गरज गरजवंतांची या उपक्रमाअंतर्गत दर रविवारी दोन तास फिरून ज्या ...

Distribution of masks, sanitizers to rural hospitals | ग्रामीण रुग्णालयास मास्क, सॅनिटायझरचे वाटप

ग्रामीण रुग्णालयास मास्क, सॅनिटायझरचे वाटप

शिर्डी येथील इयत्ता दहावीत शिकणारा साईश विनोद गोंदकर याच्या गरज गरजवंतांची या उपक्रमाअंतर्गत दर रविवारी दोन तास फिरून ज्या नागरिकांना घरातील टाकाऊ वस्तूमधील वापरण्यास योग्य असलेल्या वस्तू गोळा करून गरजू व्यक्तींना देण्यात येत आहेत. वस्तू गरजवंतास घरपोच दिल्या जातात. याच उपक्रमाअंतर्गत पुणतांबा येथील ग्रामीण रुग्णालयास सॅनिटायझर, औषधे, मास्क, हातमाेजे या वस्तू मुख्य वैद्यकीय अधिकारी कुंदन गायकवाड यांच्याकडे सुपुर्द केली. यावेळी पुणतांबा गावचे सरपंच डॉ. धनंजय धनवटे, माजी सरपंच मुरलीधर थोरात, मनोज गुजराथी, न्यू इंग्लिश स्कूलचे शिक्षक सूर्यवंशी, नामदेवराव धनवटे, प्रताप वहाडणे, भाऊसाहेब केरे उपस्थित होते.

180521\104142.jpg

पुणतांबा ग्रामीण रुग्णालयास विविध वस्तूचे वाटप

Web Title: Distribution of masks, sanitizers to rural hospitals