पोलीस प्रशासनास मास्कचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:22 IST2021-04-21T04:22:14+5:302021-04-21T04:22:14+5:30
काकडे यांच्या वतीने तुकाराम विघ्ने यांनी हे मास्क स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके, कोतवालीचे निरीक्षक राकेश मानगावकर, नगर ...

पोलीस प्रशासनास मास्कचे वाटप
काकडे यांच्या वतीने तुकाराम विघ्ने यांनी हे मास्क स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके, कोतवालीचे निरीक्षक राकेश मानगावकर, नगर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र सानप यांच्याकडे सुपुर्द केले. यावेळी सहायक निरीक्षक मिथुन घुगे, सोमनाथ दिवटे, संदीप घोडके, संदीप पवार, शंकर चौधरी, कमलेश पाथरुड, विनोद मासाळकर, नाणेकर, प्रमोद लहारे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यासह शहरात कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. पोलीस कर्मचारी हॉटस्पॉट भागासह शहरात विविध ठिकाणी सेवा देत आहेत. त्यामुळे सामाजिक भावनेतून मास्कचे वितरण करण्यात आले असल्याची भावना अॅड. शिवाजीराव काकडे यांनी व्यक्त केली.
---------
फोटो - २०मास्क वाटप
कोरोना महामारीच्या लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावत असलेल्या पोलीस प्रशासनास अॅड. शिवाजीराव काकडे यांच्या वतीने एन ९५ मास्कचे वाटप करण्यात आले.