मदारी समाजाला घरकुलांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:19 IST2021-04-15T04:19:15+5:302021-04-15T04:19:15+5:30
यावेळी जामखेड पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सांख्यिकी कैलास खेत्रे, उपसरपंच श्रीकांत लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य वैभव जमकावळे, मदन पाटील, ...

मदारी समाजाला घरकुलांचे वाटप
यावेळी जामखेड पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सांख्यिकी कैलास खेत्रे, उपसरपंच श्रीकांत लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य वैभव जमकावळे, मदन पाटील, गणेश शिंदे, महालिंग कोरे, भगवान दराडे, दादा जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोडत पद्धतीने क्रमांकाने वाटप करण्यात आले.
वाटप झाल्यानंतर एक हेक्टर क्षेत्रावर लाभार्थी मदारी समाजातील नागरिकांच्या वसाहतीसाठी वर्ग केलेल्या जागेची पाहणी करण्यात आली.
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत २०१८ मध्ये मंत्रालयात झालेल्या बैठकीत मदारी समाजासाठी पहिली वसाहत जामखेड तालुका येथील खर्डा येथे उभारण्याची मंजुरी देण्यात आली. घरांसाठी प्रत्येकी पाच गुंठे जागा व सर्व मूलभूत सुविधा एकूण ८८ लाख १० हजार रुपये एवढ्या रकमेची प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. तत्कालीन मंत्री प्रा. राम शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता.
या योजनेंतर्गत २० लाभार्थी कुटुंबासाठी घरे उपलब्ध करून देणेबाबत मंत्रालयात निर्णय घेण्यात आला होता. अनेक दिवसापासून प्रलंबित असणारी योजना प्रत्यक्षात सुरुवात होणार यासाठी जागेची स्थळ पाहणी करण्यात आली.
यावेळी मदारी समाजाचे हुसेन मदारी, फत्तू मदारी, महेबूब मदारी, सलीम मदारी, मोहम्मद मदारी, रहीम मदारी, सिकंदर मदारी यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते.