मानव विकास संशोधन केंद्रातर्फे किराणा वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:26 IST2021-06-09T04:26:03+5:302021-06-09T04:26:03+5:30

श्रीगोंदा : तालुक्यातील जोशीवस्ती, लिंपणगाव येथे वास्तव्य करून असलेल्या ३०० भटक्या–विमुक्त समाजातील कुटुंबांना भालचंद्र सावंत यांचे मानव विकास संशोधन ...

Distribution of groceries by Human Development Research Center | मानव विकास संशोधन केंद्रातर्फे किराणा वाटप

मानव विकास संशोधन केंद्रातर्फे किराणा वाटप

श्रीगोंदा : तालुक्यातील जोशीवस्ती, लिंपणगाव येथे वास्तव्य करून असलेल्या ३०० भटक्या–विमुक्त समाजातील कुटुंबांना भालचंद्र सावंत यांचे मानव विकास संशोधन केंद्र यांच्या पुढाकाराने किराणा मालाचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमात पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते असीम तांबोळी, जान्हवी खांडेकर, अस्मा तांबोळी यांनी उपलब्ध करून दिलेल्या अर्थसहाय्यातून व प्रा. विनायक लष्कर, दयानंद कनकदंडे, मेहबूब शेख यांच्या सहकार्यातून या मदतीचे वाटप करण्यात आले. जोशी वस्ती येथील ग्रामपंचायत सदस्या उषा फुलचंद सावंत यांनी मदतीच्या वाटपाचे नियोजन केले. याकामी त्यांना आशा सेविका भामा फुलमाळी यांनी सहकार्य केले.

यावेळी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक रामदास ठाकर, डॉ. राजेश पाखरे, सामाजिक कार्यकर्ते राहुल भंडारी, प्रदीप कोकाटे, फुलचंद सावंत, सागर शिंदे आदी उपस्थित होते.

Web Title: Distribution of groceries by Human Development Research Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.