शेवगाव : आमदार मोनिका राजळे यांच्या पाठपुराव्यामुळे अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना खावटी अनुदान योजनेतून तालुक्यातील ४८८ जणांना प्रत्येकी दोन हजार रुपयांसह दोन हजार रुपयांच्या अन्नधान्य व किराणा साहित्य मंजूर झाल्याची माहिती प्रदेश भाजप किसान मोर्चाचे सदस्य बापूसाहेब पाटेकर यांनी दिली आहे. गुरुवारी सकाळी ढोरजळगाव येथे प्रातिनिधिक स्वरुपात वडुले, वाघोली, ढोरजळगावने, मलकापूर, ढोरजळगावशे, भातकूडगाव, निंबे, सामनगाव, मळेगाव, अमरापूर, आदी गावातील लाभार्थ्यांना अन्नधान्य व किराणा मालाचे वाटप करण्यात आले. आदिवासी विकास प्रकल्पाचे तालुका संघटक सुधीर सांगळे, भाजप तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे, जिल्हा उपाध्यक्ष वाय. डी. कोल्हे, भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष उमेश भालसिंग, सरचिटणीस संदीप वाणी, बाळासाहेब कराड, महिला आघाडी अध्यक्षा आशाताई गरड, उपसरपंच प्रीतम ज्ञानेश्वर कराड, सदस्या अश्विनी अभय कराड, महिला आघाडी सरचिटणीस सविता काकडे, आदिनाथ कराड, मुसाभाई शेख, महादेव पाटेकर, गणेश गरड, गणेश गोर्डे, नंदूमामा आहेर, ज्ञानेश्वर कराड, मोहनराव उकिर्डे, माजी सरपंच सुखदेव उकिर्डे, ग्रामपंचायत सदस्य किशोर कराड, शांतवन साके, रामेश्वर उकिर्डे, अशोक माळी, ग्रामसेवक प्रतिभा पिसोटे आदी उपस्थित होते.
शेवगावच्या ४८८ खावटी योजनेतून किराणा मालाचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:18 IST