अळकुटी सेवा संस्थेचे सभासदांना लाभांश वाटप

By | Updated: December 5, 2020 04:39 IST2020-12-05T04:39:09+5:302020-12-05T04:39:09+5:30

अळकुटी : तालुक्यातील अळकुटी सहकारी सेवा संस्थेच्या वतीने सभासदांना लाभांश वाटप करण्याचा निर्णय संस्थेच्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती ...

Distribution of dividends to the members of Alkuti Seva Sanstha | अळकुटी सेवा संस्थेचे सभासदांना लाभांश वाटप

अळकुटी सेवा संस्थेचे सभासदांना लाभांश वाटप

अळकुटी : तालुक्यातील अळकुटी सहकारी सेवा संस्थेच्या वतीने सभासदांना लाभांश वाटप करण्याचा निर्णय संस्थेच्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती अध्यक्ष बाळासाहेब पुंडे यांनी दिली.

संस्थेच्या माध्यमातून सभासदांना नेहमी आर्थिक पाठबळ देण्याचे काम केले जाते. मध्यतंरी अवकाळी पाऊस झाल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला होता. दुसरीकडे रबी हंगामातील पिकांना हवामान साथ देत नाही. त्यामुळे सभासदांना संस्थेच्या नफ्यातून लाभांशाची तरतूद करून सभासदांना यावर्षी लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पुंड यांनी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष शिवाजी शिरोळे, शशिकांत पुंडे, संपत शिरोळे, सावकार शिरोळे, शशिकांत कनिंगध्वज, बाळासाहेब भंडारी, बाळासाहेब धोत्रे, संदीप मुळे, सहादू भंडारी, मारुती म्हस्कुले, भामाबाई शिरोळे, संगीता नरड आदी उपस्थिती होते. रबी हंगामातील पीक कर्ज वाटप सुरू असून आवश्यक कागदपत्रे देऊन पीक कर्जाची सभासदांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सचिव व्ही. बी. लव्हांडे यांनी केले.

Web Title: Distribution of dividends to the members of Alkuti Seva Sanstha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.