तोफखाना येथे आयुर्वेदिक गोळ्यांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:28 IST2021-09-10T04:28:32+5:302021-09-10T04:28:32+5:30
....... विजय पादीर यांचा सत्कार अहमदनगर: आर्किटेक्ट्स इंजिनिअर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विजय पादीर यांचा बारस्कर परिवाराच्या ...

तोफखाना येथे आयुर्वेदिक गोळ्यांचे वाटप
.......
विजय पादीर यांचा सत्कार
अहमदनगर: आर्किटेक्ट्स इंजिनिअर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विजय पादीर यांचा बारस्कर परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी महापालिकेचे विरोधी पक्षनेता संपत बारस्कर, मनपा सभागृहनेता रवींद्र बारस्कर, उद्योजक नवनाथ धुमाळ, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, राजेंद्र बारस्कर, रमेश बारस्कर, गणेश वाकळे, संकेत पादीर, अक्षय बारस्कार, रोहन बारस्कार, रमेश बोरुडे आदी उपस्थित होते.
........
ऑक्सिजन प्रकल्पासाठी पुन्हा निविदा
अहमदनगर : महापालिकेच्या वतीने सावेडी कचरा डेपो येथे ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेने निविदा मागविल्या होत्या. त्यास प्रतिसादही मिळाला होता. परंतु, ठेकेदार संस्थेने मुदतीत काम करणे शक्य नसल्याबाबत पालिकेला पत्र दिले. त्यामुळे पूर्वीची निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली असून, पुन्हा निविदा मागविण्यात आल्या आहेत.
.....
संतोष लांडगे पाथर्डी नगरपरिषदेचे सीईओ
अहमदनगर : महापालिकेचे सहायक आयुक्त संताेष लांडगे यांची पाथर्डी नगरपरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली आहे. लांडगे हे यापूर्वी आयकर विभागात कार्यरत होते. महापालिकेत लांडगे यांनी कोविड काळात ‘ब्रेक द चेन’ मोहीम राबविली. तसेच उपायुक्तपदी कार्यरत असताना त्यांनी करवसुलीची धडाकेबाज मोहीम राबविली.
.....