प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिकांचे वाटप सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:24 IST2021-05-25T04:24:08+5:302021-05-25T04:24:08+5:30

अहमदनगर : चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीवरील व्याजातून ४५ प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला असून, या ...

Distribution of ambulances to primary health centers started | प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिकांचे वाटप सुरू

प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिकांचे वाटप सुरू

अहमदनगर : चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीवरील व्याजातून ४५ प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला असून, या रुग्णवाहिकांचे प्रत्यक्षात वाटप सुरू झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीचे सभापती तथा उपाध्यक्ष प्रताप शेळके यांनी सांगितली.

सोमवारी (दि. २४) सकाळी ११.३० वाजता शेळके यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद आरोग्य समिती आढावा सभा ऑनलाइन पद्धतीने झाली. सभेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागामार्फत चालू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेत शेळके यांनी समाधान व्यक्त केले, तसेच नॉन कोव्हिड आरोग्य सेवांमध्ये एप्रिल १ मध्ये राज्यस्तरीय मूल्यांकनामध्ये अहमदनगर जिल्हा परिषद आरोग्य विभागाचा राज्यात प्रथम क्रमांक आल्यामुळे सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला.

कोरोनाच्या ग्रामीण भागातील परिस्थितीची माहिती घेऊन संभाव्य तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेण्याच्या व सोयी-सुविधा पुरविण्याच्या सूचना शेळके यांनी आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.

बैठकीस सदस्य सीताराम राऊत, सोमनाथ पाचारणे, रामभाऊ साळवे, सविताताई अडसुरे, पंचशिला गिरमकर, नंदा गाडे, पुष्पाताई वराळ, कविताताई लहारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांच्यासह डॉ. प्रकाश लाळगे, दादासाहेब साळुंके, डॉ. भागवत दहीफळे आदी उपस्थित होते.

Web Title: Distribution of ambulances to primary health centers started