प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:21 IST2021-04-09T04:21:30+5:302021-04-09T04:21:30+5:30

या बैठकीत प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा झाली. त्यामध्ये प्रलंबित मेडिकल बिले, अर्जित रजेचा पगार, अंशदायी पेन्शन योजनेच्या ...

Discussion of pending questions of primary teachers | प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा

प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा

या बैठकीत प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा झाली. त्यामध्ये प्रलंबित मेडिकल बिले, अर्जित रजेचा पगार, अंशदायी पेन्शन योजनेच्या हिशेबाच्या बिनचूक पावत्या शिक्षकांना त्वरित मिळाव्यात, आंतर जिल्हा बदलीने बदलून आलेल्या शिक्षकांची सेवाजेष्ठता नोंद सेवा पुस्तकात घ्यावी. स्व. विलास शिंदे हे शिक्षक निवडणूक कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराच्या झटक्याने मयत झाले होते. त्यांच्या नुकसान भरपाईचा पाठपुरावा शिक्षण विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करावा. यापुढे निवडणूक आदेश देताना शिक्षकांचे वय व प्रकृती स्वास्थ्य यांची चौकशी करून तहसील कार्यालयाकडे शिक्षकांची यादी द्यावी, कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता तालुक्यातील सर्व शिक्षकांचे लवकरात लवकर लसीकरण करावे, प्राथमिक शाळांचे थकीत वीज बिल भरण्याचे ग्रामपंचायतींना आदेश द्यावेत, यासह विविध विषयावर चर्चा झाली.

यावेळी जिल्हा शिक्षण समिती सदस्य राजेश परजणे यांनी व उपसभापती अर्जुन काळे यांनी तालुक्यातील जिल्हा परिषदेत प्रलंबित असलेल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले. यावेळी श्रीराम तांबे, सीताराम गव्हाणे, प्रमोद जगताप, दत्ता गरुड, संजय खरात, आप्पासाहेब चौधरी, लक्ष्मीकांत वाडीले, श्रीकांत साळवे, बाबासाहेब डगळे, विक्रम पवार, रामदास कदम, संदीप नंदेश्वर, बंडू राठोड शिक्षक उपस्थित होते.

Web Title: Discussion of pending questions of primary teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.