सरपंचावर अविश्वास ठराव : दिघोळ गावातील महिलांनी नोंदवला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 12:33 IST2019-05-29T12:33:47+5:302019-05-29T12:33:56+5:30
जामखेड तालुक्यातील दिघोळ ग्रामपंचायतीचे सरपंच दत्तात्रय होनमाने यांच्याविरोधातील अविश्वास ठरावा विरोधात

सरपंचावर अविश्वास ठराव : दिघोळ गावातील महिलांनी नोंदवला निषेध
हळगाव : जामखेड तालुक्यातील दिघोळ ग्रामपंचायतीचे सरपंच दत्तात्रय होनमाने यांच्याविरोधातील अविश्वास ठरावा विरोधात गावातील होनमाने गटाने विशेषत: महिलांनी अविश्वास ठरावाविरोधात काळे झेंडे दाखवून अविश्वास ठरावाचा निषेध नोंदवला.
सध्या अविश्वास ठरावावर ग्रामपंचायतमध्ये मतदान सुरू आहे. तहसीलदार विशाल नाईकवाडे निवडणुक निर्णय अधिकारी काम पाहत आहेत. ११ ग्रामपंचायत सदस्य असून ८ सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे. दिघोळ गाव शिडीर्चे खासदार सदाशिव लोखंडे यांचे गाव आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण अवतारसिंग चव्हाण, हेड काँस्टेबल नवनाथ भिताडे, विजय कोळी, मनोज साखर, विष्णू म्हत्रे यांच्यासह फौजफाटा गावात दाखल आहे.