विकासकामांच्या निधी वाटपात दुजाभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:15 IST2021-06-22T04:15:28+5:302021-06-22T04:15:28+5:30
शेवगाव : राज्यात ४० हजार किलोमीटर लांबीचे रस्ते उभारणार अशी घोषणा महाविकास आघाडी सरकारने विधानसभेत केली होती. मात्र, ती ...

विकासकामांच्या निधी वाटपात दुजाभाव
शेवगाव : राज्यात ४० हजार किलोमीटर लांबीचे रस्ते उभारणार अशी घोषणा महाविकास आघाडी सरकारने विधानसभेत केली होती. मात्र, ती घोषणा हवेतच विरली आहे. विकासकामांच्या निधी वाटपातही हे आघाडी सरकार दुजाभाव करत असल्याचा आरोप आमदार मोनिका राजळे यांनी केला आहे.
तालुक्यातील वरूर येथे ६५ लाख रुपये खर्चाच्या वरूर ते भगूर रस्ताकामाचा मजबुतीकरण व डांबरीकरण, ७ लाख रुपये खर्चाचे समाज मंदिर कामाचा प्रारंभ सोमवारी झाला. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे, महिलाध्यक्षा आशा गरड, उषा कंगणकर, उपनगराध्यक्ष वजीर पठाण, बापूसाहेब भोसले, दिनेश लव्हाट, भिमराज सागडे, वृद्धेश्वरचे संचालक ॲड. अनिल फलके, बापू पाटेकर, उमेश भालसिंग, तुषार पुरनाळे, गंगा खेडकर, रवी सुरवसे, गणेश मोरे, गणेश म्हस्के, संजय म्हस्के, अशोक शिंदे, सहायक अभियंता अंकुश पालवे, पी. ए. पाठक, ठेकेदार बाळासाहेब मुरदारे, संदीप वाणी आदी उपस्थित होते.
210621\20210621_110622.jpg
शेवगाव तालुक्यातील वरूर ते भगूर दरम्यानच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करतांना आमदार मोनिका राजळे व यावेळी उपस्थित भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ.