संगमनेर शहरात नळाद्वारे गढूळ, दुर्गंधीयुक्त पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:25 IST2021-08-12T04:25:30+5:302021-08-12T04:25:30+5:30
शहरप्रमुख अमर कतारी, कार्याध्यक्ष दीपक साळुंखे, उपशहर प्रमुख विकास डमाळे, इम्तियाज शेख, दीपक वन्नम, माजी नगरसेवक लखन घोरपडे, समन्वयक ...

संगमनेर शहरात नळाद्वारे गढूळ, दुर्गंधीयुक्त पुरवठा
शहरप्रमुख अमर कतारी, कार्याध्यक्ष दीपक साळुंखे, उपशहर प्रमुख विकास डमाळे, इम्तियाज शेख, दीपक वन्नम, माजी नगरसेवक लखन घोरपडे, समन्वयक आसिफ तांबोळी, संघटक रवींद्र कानकाटे, विद्यार्थी शहरप्रमुख सचिन साळवे, युवासेना शहर प्रमुख अमोल डुकरे, उपशहर प्रमुख फैजल सय्यद, व्यापारी सेनेचे संभव लोढा, अल्ताफ शेख, कार्यालयीन प्रमुख बंडू म्हाळस आदी यावेळी उपस्थित होते.
शहरात नळाद्वारे गढूळ, दुर्गंधीयुक्त पाणी येते असल्याने, अनेक नागरिकांना पोटाच्या विकारांचे त्रास होत आहे. लहान मुलांना जुलाब, उलट्या, अतिसार असा त्रास होतो आहे. कोरोनामुळे नागरिक त्रस्त झाले असताना दूषित पाण्यामुळे त्यांचे आरोग्य अजूनही धोक्यात आले आहे. त्यामुळे नळाद्वारे शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आले, तसेच शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पम्पिंग स्टेशन येथील जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करत, पाणीपुरवठा विभागाच्या अभियंता जयश्री मोरे यांची भेट घेतली.