दिलीप गांधी म्हणतात... अजूनही वेळ गेलेली नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 15:32 IST2019-03-13T15:32:21+5:302019-03-13T15:32:58+5:30
सुरुवातीपासूनच मी जनसंघाचा कार्यकर्ता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडवणीस यांनी मोठ्या प्रमाणात विकास कामे केली.

दिलीप गांधी म्हणतात... अजूनही वेळ गेलेली नाही
अहमदनगर : सुरुवातीपासूनच मी जनसंघाचा कार्यकर्ता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडवणीस यांनी मोठ्या प्रमाणात विकास कामे केली. लोकसभेत भाजपचे जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्याबाबत वरिष्ठांनी काही निर्णय घेतले आहेत. त्यासाठी दोन-चार दिवसांचा वेळ लागेल, परंतु चांगला निर्णय होऊ शकतो, अशी आशा खासदार दिलीप गांधी यांनी आझ कार्यकर्त्यांशी बोलताना व्यक्त केली. खासदार कार्यालयात गांधी यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
गांधी म्हणाले, मुख्यमंत्री आणि केंद्रातील नेत्यांना दोन -चार दिवसांमध्ये भेटणार आहे. कार्यकर्त्यांच्या भावना त्यांना कळवणार आहे. काही निर्णय राजकीय असू शकतात. त्यातून आपणाला मार्ग काढता येऊ शकतो. अजूनही वेळ गेलेली नाही. कोणाला दुखवत आपल्याला काम करायचे नाही. त्यामुळे दोन-चार दिवस आपण थांबून योग्य तो निर्णय घेऊ.
मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.सुजय विखे यांच्या प्रवेशाच्या वेळी लोकसभेच्या तिकिटाचे स्पष्ट संकेत दिले. त्यानंतरही खासदार दिलीप गांधी यांना अजूनही आशा कायम आहे.