श्रीरामपूर मतदारसंघातील शाळांत डिजिटल क्रांती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:14 IST2021-07-23T04:14:04+5:302021-07-23T04:14:04+5:30
श्रीरामपूर तसेच राहुरी तालुक्यातील सर्व शाळांना त्यांच्या पटसंख्येप्रमाणे संच देण्यात आले आहेत. बालभारतीने विकसित केलेल्या अभ्यासक्रमाचे सॉफ्टवेअरही समाविष्ट करण्यात ...

श्रीरामपूर मतदारसंघातील शाळांत डिजिटल क्रांती
श्रीरामपूर तसेच राहुरी तालुक्यातील सर्व शाळांना त्यांच्या पटसंख्येप्रमाणे संच देण्यात आले आहेत. बालभारतीने विकसित केलेल्या अभ्यासक्रमाचे सॉफ्टवेअरही समाविष्ट करण्यात आलेले आहे. हे तंत्रज्ञान वापरण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता नाही. शिक्षकांना ते सहज हाताळता येणार आहे.
तंत्रस्नेही शिक्षणाची संकल्पना या उपक्रमातून राबविली जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणार आहे. स्थानिक विकास निधीतून तब्बल अडीच कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
गुरुवारी तालुक्यातील बेलापूर शाळेमध्ये शिक्षकांसाठी सॉफ्टवेअर वापराचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी आमदार कानडे, उपनगराध्यक्ष करण ससाणे, सचिन गुजर, इंद्रनाथ थोरात, अरुण नाईक, ज्ञानेश्वर मुरकुटे, सुधीर नवले, गटशिक्षणाधिकारी संजीवन दिवे, मुख्याध्यापिका आर.जे. कांबळे, शिक्षक एकनाथ पटेकर, राजेंद्र पंडित, मंदा दुर्गुडे, गणेश पिंगळे, अनिल ओहोळ उपस्थित होते.
-----------
मी स्वत: शिक्षक राहिलो आहे. बालभारतीवरही काम केलेले आहे. त्यामुळे अध्यापन प्रक्रिया सुलभ व विद्यार्थी केंद्रित व्हावी यासाठी मी सतत प्रयत्न केला आहे. उजळणी व गृहपाठाअभावी विद्यार्थी कमी पडतात. त्यामुळे सरकारी शाळांना बळकट करण्यासाठी हा तंत्रस्नेही उपक्रम राबविला आहे.
आमदार लहू कानडे.
---------
फोटो वापरणे : आमदार लहू कानडे.
---------