राहात्यात धूम स्टाईलने ३१ तोळे सोने लांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 16:29 IST2018-06-09T16:24:16+5:302018-06-09T16:29:21+5:30
राहाता शहरातील शारदा विद्या मंदिर समोरुन ३१ तोळे सोन्याचे दागिने असलेली पिशवी अज्ञात चोरट्यांनी धूम स्टाईलने हातातून हिसकावून नेल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली.

राहात्यात धूम स्टाईलने ३१ तोळे सोने लांबविले
राहाता : राहाता शहरातील शारदा विद्या मंदिर समोरुन ३१ तोळे सोन्याचे दागिने असलेली पिशवी अज्ञात चोरट्यांनी धूम स्टाईलने हातातून हिसकावून नेल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली.
शहरातील रखमाजी कलप्पा शिंदे ( वय ६२, रा. त्रिशुलनगर, राहाता ) हे शुक्रवारी दुपारी चार वाजता युनियन बँकेत ठेवलेले सोन्याचे दागिने सोडवण्याकरिता गेले होते. लॉकरमधून दागिने सोडवून ते घरी दुपारी चार वाजता त्यांच्या साई फुटवेअर या दुकानावर जात असताना नगर-मनमाड रोडवर शारदा शैक्षणिक समोर पॅशन-प्रो मोटारसायकलवरुन आलेल्या दोन अज्ञात इसमाने त्याच्या हातात असलेली दागिन्यांची पिशवी हिसकावून नेली. या पिशवीत सुमारे साडेएकतीस तोळे सोन्याचे दागिने होते. त्याची किंमत ९ लाख रुपये आहे, घटनेची माहीती मिळताच उपविभागीय अधिकारी सागर पाटील यांनी घटनास्थळी दाखल होत चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा तपास लागला नाही.