शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

धनंजय, कधी कधी हरभजन सिंगही सामना जिंकून देतो रे - अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 10:45 IST

राहुरीच्या सभा मैदानावर अजित पवार , धनंजय मुंडेंची बॅटिंग रंगली

राहुरी : आज माझी खूप अवघडल्यासारखी परिस्थिती झाली आहे. क्रिकेटच्या सामन्यात विराट कोहलीच्या फलंदाजीनंतर हरभजन सिंग बॅटिंगला आला आहे. आता त्याची बॅटिंग कोण पाहणार तसे माझे झाले आहे, असे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हणताच ‘अरे धनंजय कधी कधी हरभजनसिंगही सामना जिंकून देतो रे. त्यामुळे तू बिनधास्त बॅटिंग कर’, अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंडे यांना धीर दिला.झाले असे की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र हल्लाबोल यात्रेस गुरुवारी श्रीगोंदा येथून प्रारंभ झाला. त्यानंतर शेवगाव येथील सभा झाल्यानंतर राहुरी येथील शेवटच्या सभेसाठी राष्ट्रवादीचे नेते पोहोचले होते. सायंकाळी असलेल्या सभेला विलंब होऊ लागल्याने विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे थेट व्यासपीठावरच आले आणि भाषणाला सुरुवात केली. तर युवकांच्या आग्रहाखातर धनंजय मुंडे मोटारसायकल रॅलीसाठी स्वत: मोटार सायकलवर बसून रॅलीत सहभागी झाले. मोटारसायकल रॅली संपवून मुंडे सभास्थळी आली तेव्हा अजित पवार यांचे भाषण सुरु होते. अजित पवार यांचे भाषण संपताच उपस्थितांनी धनंजय मुंडे यांनी भाषण करावे, असा आग्रह धरला.प्रदेशाध्यक्ष आणि विधीमंडळ पक्षनेते यांनी भाषण केल्यानंतर मी बोलणे पक्षशिस्तीत बसत नाही, असा निर्वाळा मुंडे यांनी दिला. मात्र तरीही श्रोत्यांच्या आग्रहाखातर अजित पवार यांनी मुंडे यांना भाषण करण्याची परवानगी दिली. कोहलीची बॅटिंग झाल्यानंतर हरभजन सिंगची बॅटिंग आता कोण पाहणार? असा मिश्किल सवाल मुंडे यांनी उपस्थित केला. यावर त्याच खेळकर वृत्तीने अजित पवारांनीही मुंडे यांना उत्तर देत म्हटले की, कधी कधी हरभजन सिंग सुद्धा सामना जिंकून देतो, तू बिनधास्त भाषण कर, अशा शब्दात धनंजय मुंडे यांना मॅच वीनरचा किताब दिला.मुंडे जेव्हा भाषणाला उभे राहिले तेव्हा त्यांनी पहिल्यांदा अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे आभार व्यक्त केले. पक्षशिस्त पाळणारा मी एक आज्ञाधारक कार्यकर्ता आहे़ त्यामुळे मला आज शेवटी बोलताना खूप अवघडल्यासारखे वाटते. दादा तुम्ही परवानगी दिली, हा तुमचा मोठेपणा आहे. तुम्ही आदेश दिला आहे आणि मी आदेश पाळणारा कार्यकर्ता आहे, म्हणून बोलतो असे सांगत आपल्या नेहमीच्या फॉर्मात सरकारविरुद्ध जोरदार बॅटिंग करीत सभा जिंकली.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारDhananjay Mundeधनंजय मुंडेAhmednagarअहमदनगरRahuriराहुरी