भाविकांनी साधली श्रावणी शनिवारची पर्वणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 12:13 IST2019-08-03T12:12:35+5:302019-08-03T12:13:50+5:30

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र शनी शिंगणापूर येथे शनिभक्तांनी श्रावण महिन्याच्या पहिल्या शनिवारची पर्वणी साधत स्वयंभू शनीमुर्तीला मनोभावे स्नान घातले.

Devotees wished Shravani Saturday | भाविकांनी साधली श्रावणी शनिवारची पर्वणी

भाविकांनी साधली श्रावणी शनिवारची पर्वणी

सोनई : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र शनी शिंगणापूर येथे शनिभक्तांनी श्रावण महिन्याच्या पहिल्या शनिवारची पर्वणी साधत स्वयंभू शनीमुर्तीला मनोभावे स्नान घातले.
आज श्रावणाच्या पहिल्या शनिवारी हजारो भाविकांनी पाणी घालत तेल अभिषेक घालत मनोभावे दर्शन घेतले. श्रावण महिन्यातील पहिलाच शनिवार असल्यामुळे भल्या पहाटेपासून शनिदेवाच्या मूतीर्ला स्नान घालण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. औरंगाबाद खंडपिठाचे मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यानंतर भाविकांनी स्नान करत शनीमुर्तीला स्नान घातले. देवस्थानच्या वतीने दर्शन रांगेतच स्नानासाठी पाण्याची सोय करण्यात आली होती.
 

Web Title: Devotees wished Shravani Saturday