पश्चिमी वाहिन्यांचे पाणी गोदावरीत वळविण्याच्या प्रकल्पाला मंजूरी द्यावी - देवेंद्र फडणवीस
By अण्णा नवथर | Updated: October 26, 2023 16:24 IST2023-10-26T16:22:49+5:302023-10-26T16:24:22+5:30
राज्य सरकारने प्रकल्प तयार केला असून,त्यास मंजूरी द्यावी, असे फडणवीस म्हणाले.

पश्चिमी वाहिन्यांचे पाणी गोदावरीत वळविण्याच्या प्रकल्पाला मंजूरी द्यावी - देवेंद्र फडणवीस
अहमदनगर: समुद्रात जणारे पश्चिमी वाहिन्यांचे पाणी गोदारीत सोडविण्याबाबतचा प्रकल्प राज्य सरकारने तयार केला असून, त्यास मंजूरी द्यावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली.
शिर्डी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित झालेल्या झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे, म्हणाले, की राज्यात दुष्काळग्रस्त भागात शेतकरी आत्महत्या करत आहेत. राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्न करत आहे. पश्चिमी वाहिन्यांचे पाणी समुद्रात वाहून जाते. हे पाणी गोदावरी नदीत सोडून अहमदनगरसह मराठवाड्याला दुष्काळमुक्त करता येईल. त्यासाठी राज्य सरकारने प्रकल्प तयार केला असून,त्यास मंजूरी द्यावी, असे फडणवीस म्हणाले.