मागच्या ५ वर्षात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी उत्तम काम केलं- राधाकृष्ण विखे पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2022 16:25 IST2022-08-28T16:22:16+5:302022-08-28T16:25:02+5:30
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सत्कार यावेळी भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह यावेळी पाहायला मिळाला.

मागच्या ५ वर्षात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी उत्तम काम केलं- राधाकृष्ण विखे पाटील
महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेर शहरात भव्य दिव्य मिरवणूक काढत शक्ती प्रदर्शन केले आहे. संगमनेर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सत्कार यावेळी भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह यावेळी पाहायला मिळाला. तसेच हे सरकार जनसामान्यांचा सरकार असल्याचे देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. त्याचप्रमाणे मागच्या पाच वर्षात मुख्यमंत्री म्हणुन देवेंद्र फडणवीस यांनी उत्तम काम केले. त्यांच्या कार्यकाळामध्ये अनेक उपक्रम सुरु झाले, असं कौतुकही राधाकृष्ण विखे पाटलांनी यावेळी केले.