गावकऱ्यांच्या एकीतूनच गावचा विकास शक्य
By | Updated: December 5, 2020 04:37 IST2020-12-05T04:37:20+5:302020-12-05T04:37:20+5:30
शेवगाव : कोविड-१९ संसर्गामुळे बहुतेक विकास कामे थांबली गेली. जिल्हा परिषदेचा निधी कोविडसाठी वळविला गेला असे असतानाही आपल्या रस्त्याला ...

गावकऱ्यांच्या एकीतूनच गावचा विकास शक्य
शेवगाव : कोविड-१९ संसर्गामुळे बहुतेक विकास कामे थांबली गेली. जिल्हा परिषदेचा निधी कोविडसाठी वळविला गेला असे असतानाही आपल्या रस्त्याला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी एकजूट होऊन विकासाच्या कामासाठी एकत्र येऊन काम केले पाहिजे. तरच गावचा विकास होईल तसेच कामही दर्जेदार होईल, असे प्रतिपादन जनशक्ती विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ॲड. शिवाजीराव काकडे यांनी केले.
गुरुवारी लाडजळगाव गटाच्या जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांच्या विकास निधीतून ३०५४ योजनेंतर्गत राणेगाव ते आधोडी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आसाराम तिडके होते. यावेळी हर्षदा काकडे, जनशक्तीचे जगन्नाथ गावडे, संजय आंधळे, ठेकेदार राजू फकीर, उपअभियंता शिदोरे, भागवत रासनकर, देवराव दारकुंडे, सचिन आधाट, सरपंच रमेश जाधव, भाऊसाहेब मासाळ, भाऊसाहेब बर्डे, आबासाहेब काकडे, भाऊसाहेब पोटभरे, नानाभाऊ चेमटे, भुजंगराव चेमटे, भारत लांडे, बाबासाहेब अडसरे, भगवानराव तिडके, भानुदास गुंजाळ, अंबादास गाढवे, बाबासाहेब भाबड, अशोक वाघ, नारायण गाढवे, जनार्दन खेडकर, एकनाथ खेडकर आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक संजय आंधळे, सूत्रसंचालन नवनाथ खेडकर यांनी केले, तर शंकर गाढवे यांनी आभार मानले.