आगीत सव्वा एकर क्षेत्रातील डाळिंब बाग खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:23 IST2021-03-09T04:23:47+5:302021-03-09T04:23:47+5:30

तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्यातील हसनाबाद (तळेगाव दिघे ) शिवारात अचानक आग लागून सव्वा एकर क्षेत्रातील सुमारे २०२ डाळिंबाची ...

Destroy pomegranate orchards in a quarter acre area by fire | आगीत सव्वा एकर क्षेत्रातील डाळिंब बाग खाक

आगीत सव्वा एकर क्षेत्रातील डाळिंब बाग खाक

तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्यातील हसनाबाद (तळेगाव दिघे ) शिवारात अचानक आग लागून सव्वा एकर क्षेत्रातील सुमारे २०२ डाळिंबाची झाडे आगीत खाक झाली. डाळिंब बाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने सुमारे ७ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सोमवारी (दि.८) दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

तळेगाव दिघे ते कोपरगाव रस्त्याच्या पश्चिमेला हसनाबाद (तळेगाव दिघे ) शिवारात तळेगाव सोसायटीचे अध्यक्ष तुकाराम तुळशीराम दिघे यांची शेतात वस्ती आहे. वस्तीनजीक हाकेच्या अंतरावर सव्वा एकर क्षेत्रात त्यांची डाळिंब बाग आहे. सोमवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास सदर डाळिंब बागेला अचानक आग लागली. थोड्याच वेळात आग बागेत सर्वत्र पसरली. दरम्यान तुकाराम दिघे यांचा मुलगा अनिल दिघे यांच्या हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांच्यासह कुटुंबीयांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग विझविण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. आगीत २०२ डाळिंबाची झाडे जळाली. डाळिंब बागेतील ठिबक सिंचन संचदेखील जळून गेला. डाळिंब बागेवरून वीज वाहक तारा गेलेल्या असून या तारांचे घर्षण होत ठिणग्या पडल्याने आग लागली असावी, अशी शक्यता तुकाराम दिघे यांनी व्यक्त केली. महसूल विभागाने जळालेल्या डाळिंब बागेचा पंचनामा करावा, अशी मागणीही तळेगाव सोसायटीचे अध्यक्ष तुकाराम दिघे यांनी केली आहे.

Web Title: Destroy pomegranate orchards in a quarter acre area by fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.