शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सरकार बदलले तरीही बळीराजाची चिंता कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 12:13 IST

नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर लगेच नुकसानभरपाई मिळेल, अशी आशा जिल्ह्यातील शेतक-यांना होती. परंतु, बहुतांश शेतक-यांना जाहीर केलेली मदतीची रक्कम अजून मिळालेली नाही. त्यामुळे रब्बीची पेरणी उधारीवर करण्याची वेळ शेतक-यांवर ओढावली आहे. 

अण्णा नवथर ।  अहमदनगर : नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर लगेच नुकसानभरपाई मिळेल, अशी आशा जिल्ह्यातील शेतक-यांना होती. परंतु, बहुतांश शेतक-यांना जाहीर केलेली मदतीची रक्कम अजून मिळालेली नाही. त्यामुळे रब्बीची पेरणी उधारीवर करण्याची वेळ शेतक-यांवर ओढावली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे फटाके फुटत असतानाच शेतक-यांच्या उभ्या पिकांवर निसर्गाने घाला घातला. निवडणूक निकालानंतर राज्यातील सर्व नेते शेतक-यांच्या बांधावर पोहोचले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानग्रस्त शेतक-यांना मदतही जाहीर केली. त्यानुसार जिल्ह्याला १३५ कोटींचा पहिला हप्ताही मिळाला. आॅक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीचा फटका १ हजार ५८६ गावांतील ६ लाख ३४ हजार ३३ शेतक-यांच्या खरीप पिकाला बसला. पहिल्या हप्त्यातून महसूल खात्याने सरकारी निकषानुसार २ लाख ४५ हजार ५५७ शेतक-यांच्या बँक खात्यावर मदतीची रक्कम जमा केली. साधारणपणे पहिल्या हप्ता वाटप पूर्ण होईपर्यंत दुस-या हप्त्याची रक्कम महसूल खात्याच्या तिजोरीत जमा होते, असा शिरस्ता आहे. दरम्यानच्या काळात नवीन सरकार स्थापन झाले. नवीन सरकार स्थापन झाल्याने शेतक-यांना मदतीची अपेक्षा होती. परंतु, नवीन सरकारकडून मदतीचा दुसरा हप्ता अजूनही जिल्ह्याला मिळालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ३ लाख ८८ हजार एवढे शेतकरी अजूनही सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. काही भागात रब्बीची पेरणी होऊन पिके उगवून आली. पण, अजून मदत मिळालेली नाही. काही भागात सध्या रब्बीची तयारी सुरू आहे. खरीप गेल्याने शेतक-यांच्या हातात काहीच पडले नाही. त्यामुळे रब्बीसाठी शेतकरी सरकारी मदतीवर विसंबून होते. उधारीवर खते व बियाणे खरेदी करण्याची वेळ शेतक-यांवर ओढावली आहे.  आमदारांना पडला विसरनिवडणुकीत स्वत: शेतकºयांचे कैवारी म्हणून घेणारे ग्रामीण भागातील आमदारांनी शेतक-यांच्या बांधावर जाऊन विचारपूस केली. पाहणी दौरे सुरू असतानाच त्यांना मुंबईतून फोन आले आणि ते मुंबईला रवाना झाले. सरकार स्थापन होऊन ते मतदारसंघात दाखल झाले. परंतु, जिल्ह्यातील एकाही तालुक्यात नुकसानभरपाईचा साधा आढावाही आमदारांकडून घेतला गेला नाही हे विशेष.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFarmerशेतकरी