सीए शाखेच्या अध्यक्षपदी देसरडा, काळे सचिव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:22 IST2021-03-10T04:22:29+5:302021-03-10T04:22:29+5:30
अहमदनगर : सीए नगर शाखेच्या अध्यक्षपदी सीए संदीप देसरडा, यांची तर सचिवपदी सीए ज्ञानेश्वर ऊर्फ राजेंद्र काळे यांची निवड ...

सीए शाखेच्या अध्यक्षपदी देसरडा, काळे सचिव
अहमदनगर : सीए नगर शाखेच्या अध्यक्षपदी सीए संदीप देसरडा, यांची तर सचिवपदी सीए ज्ञानेश्वर ऊर्फ राजेंद्र काळे यांची निवड करण्यात आली.
सीए शाखेचे मावळते अध्यक्ष सीए किरण भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. कार्यकारिणीचा कार्यकाळ हा तीन वर्षांचा आहे. दर तीन वर्षांनी नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येते. २०२१-२२ साठी ही निवड झाली आहे. निवड झालेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे. अध्यक्ष- संदीप देसरडा, उपाध्यक्ष- पवनकुमार दरक, सचिव व खजिनदार-ज्ञानेश्वर काळे, माजी अध्यक्ष- किरण भंडारी, समिती सदस्य-परेश बोरा.
सीए सभासदांच्या शाखेच्या समांतर असलेली सीए विद्यार्थ्यांची ‘विकासा’ शाखेच्या अध्यक्षपदी सीए पवनकुमार दरक यांची निवड या बैठकीत करण्यात आली. यावेळी मावळते अध्यक्ष किरण भंडारी व मावळते विकासाचे अध्यक्ष संदीप देसरडा यांनी गत वर्षीच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी सीए शाखेला मिळालेल्या विभागीय पातळीवरील प्रथम पारितोषिकाबद्दल सर्वांचे कौतुक केले. यावेळी सीए शाखेचे माजी अध्यक्ष मोहन बरमेचा, विजय मर्दा, संजय देशमुख, अजय मुथा, मिलिंद जांगडा, सुशील जैन, प्रसाद भंडारी, ज्ञानेश कुलकर्णी उपस्थित होते.
--
फोटो-०९ देसरडा फोटो
सीए शाखेचे नवे पदाधिकारी संदीप देसरडा, ज्ञानेश्वर काळे, पवनकुमार दरक, किरण भंडारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी पदाधिकारी.