उप विभागीय अधिकारी पाटील यांची सोलापूरला,तर मिटके व सातव यांची जिल्ह्यातील इतर विभागात बदली
By अण्णा नवथर | Updated: May 23, 2023 10:19 IST2023-05-23T10:17:39+5:302023-05-23T10:19:21+5:30
जात पडताळणी विभागातील पोलीस उपाधीक्षक सुनील त्र्यंबक भामरे यांची नाशिक ग्रामीण विभागात, तर शिर्डी येथील संजय पंढरीनाथ सातव यांची शेवगाव उपविभागीय पदी बदली झाली आहे.

उप विभागीय अधिकारी पाटील यांची सोलापूरला,तर मिटके व सातव यांची जिल्ह्यातील इतर विभागात बदली
अहमदनगर - श्रीरामपूरचे पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांची शिर्डी उपविभागात, तर नगर ग्रामीणचे उपअधीक्षक अजित पाटील यांची सोलापूर येथील ग्रामीण विभागात बदली झाली आहे.
जात पडताळणी विभागातील पोलीस उपाधीक्षक सुनील त्र्यंबक भामरे यांची नाशिक ग्रामीण विभागात, तर शिर्डी येथील संजय पंढरीनाथ सातव यांची शेवगाव उपविभागीय पदी बदली झाली आहे. तसा आदेश आवर सचिव स्वप्निल बोरसे यांनी काढला आहे.