उपायुक्त पठारे मनपाचे अतिरिक्त आयुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:16 IST2021-06-21T04:16:05+5:302021-06-21T04:16:05+5:30
अहमदनगर : महापालिकेचे उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे यांची अतिरिक्त आयुक्तपदी पदोन्नती झाली आहे. उपायुक्त पठारे यांच्या जागी राहुरी नगर ...

उपायुक्त पठारे मनपाचे अतिरिक्त आयुक्त
अहमदनगर : महापालिकेचे उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे यांची अतिरिक्त आयुक्तपदी पदोन्नती झाली आहे. उपायुक्त पठारे यांच्या जागी राहुरी नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनिवास कुर्हे यांना बढती मिळाली आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्तपद रिक्त होते. या पदावर पठारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पठारे हे महापालिकेत उपायुक्तपदावर कार्यरत होते. तीन वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाल्याने त्यांना पदोन्नती मिळाली. पदोन्नतीने पठारे अतिरिक्त आयुक्त झाले आहेत. ते सोमवारी या महापालिकेतच अतिरिक्त आयुक्तपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. पठारे यांनी यापूर्वी नगर परिषद संचालनालयात सहायक संचालक म्हणून काम पाहिलेले आहे. तेथून त्यांची बदली धुळे व मालेगाव महापालिकेत झाली. तेथून ते नगरला उपायुक्त म्हणून रुजू झाले. उपायुक्तपदावरून त्यांना अतिरिक्त आयुक्तपदी पदोन्नती मिळाली असून, येथील महापालिकेच्या कारभाराचा त्यांना तीन वर्षांचा अनुभव आहे. शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ते महापालिकेत ओळखले जातात. उपायुक्त पठारे हे अतिरक्त आयुक्त रुजू होणार असल्याने आयुक्त त्यांच्याकडे कोणती जबाबदारी सोपवतात, याची उत्सुकता आहे. पठारे यांना अतिरिक्त आयुक्तपदी पदोन्नती मिळाल्याने उपायुक्तपद रिक्त झाले होते. या जागी कुर्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
..
२० प्रदीप पठारे