एक लाखांवरील ठेवींचे वाटप होणार
By Admin | Updated: July 22, 2014 00:06 IST2014-07-21T23:13:37+5:302014-07-22T00:06:23+5:30
राहुरी : तालुक्याची एकेकाळी आर्थिक नाडी ठरलेल्या व दहा-बारा क र्जदारांमुळे अवसायनात निघालेल्या राहुरी पीपल्स बँकेच्या एक लाखांवरील ठेवी वाटपाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे़

एक लाखांवरील ठेवींचे वाटप होणार
राहुरी : तालुक्याची एकेकाळी आर्थिक नाडी ठरलेल्या व दहा-बारा क र्जदारांमुळे अवसायनात निघालेल्या राहुरी पीपल्स बँकेच्या एक लाखांवरील ठेवी वाटपाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे़ २४ जुलैपासून ठेवी वाटप होणार असल्याची माहिती अवसायक एस़ डी़ सूर्यवंशी यांनी दिली़
३ मार्च २०१० रोजी रिझर्व्ह बँकेने पीपल्सचा बँक परवाना रद्द केला होता. १० मार्च २०१४ पासून शासनाने बँकेवर अवसायक मंडळ नेमले होते़ ठेवीदारांचे पैसे परत करणे, वसुली कामकाज पूर्ण करणे ही कामे अवसायक मंडळाने केली. बँक अवसायनात गेल्यानंतर मंडळाने पहिल्या वर्षी एक लाखाच्या आतील १३ हजार ८७४ ठेवीदारांचे १६ कोटी रूपयांचे पेमेंट तातडीने दिले़ त्यासाठी ठेव विमा महामंडळाकडून बँकेला ११ कोटी २८ लाख रूपये प्राप्त झाले होते़ मंडळाने बँक अवसायनात घेतल्यापासून १३ कोटींची कर्ज व व्याज वसुली केली़त्यामुळे एक लाखावरील ठेवीदारांचे पैसे देण्यासाठी बँकेस ठेव विमा महामंडळाने संमती दिली़
पीपल्स बँकेला एक लाखांवरील ३४६ ठेवीदारांचे देणे आहे. बँकेकडे सध्या उपलब्ध असलेल्या रकमेतून पहिल्या टप्प्यात ठेवीदारांना देय असलेल्या रकमेच्या ५० टक्के व कमीत कमी वीस हजार रूपये असे १ कोटी ४९ लाख रूपये वाटप सुरू करण्यात येणार आहे़ उर्वरित रकमेचे पेमेंट करण्यासाठी कर्ज वसुलीचे कामकाज सुरू आहे़ कर्जदारांनी कर्ज रकमा त्वरित भराव्यात व ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन सूर्यवंशी यांनी केले़
बँकेने एकरकमी परत फेड योजना लागू केली असून त्याचा फायदा कर्जदारांनी घ्यावा व बँकेवर सक्तीची वसुली करण्याची वेळ आणू नये असे आवाहन अवसायक मंडळाचे सदस्य बी़ एस़ पगारे यांनी केले आहे़ वसुलीसाठी विशेष वसुली अधिकारी पी़ एस़ वारे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय गुमास्ते यांनी प्रयत्न केले़ (तालुका प्रतिनिधी )