कान्हूर पठार पतसंस्थेकडे ४०३ कोटींच्या ठेवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:21 IST2021-04-02T04:21:59+5:302021-04-02T04:21:59+5:30
पारनेर : कान्हूर पठार पतसंस्थेने ३१ मार्च रोजीच आर्थिक पत्रके जाहीर करण्याची परंपरा यावर्षी कायम ठेवत ताळेबंद, नफा-तोटा ...

कान्हूर पठार पतसंस्थेकडे ४०३ कोटींच्या ठेवी
पारनेर : कान्हूर पठार पतसंस्थेने ३१ मार्च रोजीच आर्थिक पत्रके जाहीर करण्याची परंपरा यावर्षी कायम ठेवत ताळेबंद, नफा-तोटा जाहीर केला आहे. पतसंस्थेने चारशे कोटी रुपयांचा टप्पा पार केल्याची माहिती संस्थेचे कार्यकारी संचालक दिलीप ठुबे यांनी दिली.
ठुबे म्हणाले, संस्थेने चारशे कोटींचा टप्पा पार केला. मार्चअखेर ४०४ कोटी रुपयांच्या ठेवी संस्थेकडे आहेत. या आर्थिक वर्षात ठेवींमध्ये ४६ कोटींची वाढ झाली. आर्थिक वर्षात संस्थेस ढोबळ नफा आठ कोटी रुपये झाला. सर्व तरतुदी वजा जाता निव्वळ नफा तीन कोटी आहे. विविध बँकांतील गुंतवणूक १७३ कोटी आहे. संस्थेने तरलतेचे प्रमाण योग्य पद्धतीने राखले आहे. त्यापेक्षा अधिक गुंतवणूक करण्यात आली आहे.
अध्यक्ष सुभाष नवले म्हणाले, वरील आर्थिक बाबींचा विचार करता संस्थेच्या सभासदांनी ठेवीदार, कर्जदार यांनी संस्थेवर मोठ्या प्रमाणात विश्वास दाखवला आहे. संस्थेकडे ३५ कोटी रुपयांचा स्वनिधी आहे. संस्थेने ग्राहकाभिमुख सेवा देताना बदलत्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून कोअर बँकिंग सेवा उपलब्ध केली आहे. त्यानुसार संस्थेने ग्राहकांना आरटीजीएस, एटीएम, एसएमएस, ऑनलाइन सेवा उपलब्ध करून दिली. यासोबत वीजबिल भरणा, मोबाइल व डीश टीव्ही रिचार्ज या सेवाही दिल्या आहेत.
उपाध्यक्ष राजेंद्र व्यवहारे म्हणाले, संस्थेच्या बारा शाखांच्या इमारती स्वमालकीच्या आहेत. संस्थेचे खेळते भांडवल ५०० कोटी रुपये आहे. अशा प्रकारे संस्थेची आर्थिक परिस्थिती अतिशय सक्षम आहे. (वा.प्र.)
--
०१दिलीप ठुबे