दधनेश्वरदिंडीचे प्रस्थान

By Admin | Updated: June 28, 2014 01:12 IST2014-06-27T23:34:41+5:302014-06-28T01:12:12+5:30

शेवगाव : तालुक्यातील दहिगावने येथून पंढरपूर येथे आषाढी सोहळ्यासाठी निघालेल्या कृष्णदेव महाराज काळे यांच्या मार्गदर्शनाखाली दधनेश्वर पायी दिंडीने शुक्रवारी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले.

Departure of Dineshwarvindi | दधनेश्वरदिंडीचे प्रस्थान

दधनेश्वरदिंडीचे प्रस्थान

शेवगाव : तालुक्यातील दहिगावने येथून पंढरपूर येथे आषाढी सोहळ्यासाठी निघालेल्या कृष्णदेव महाराज काळे यांच्या मार्गदर्शनाखाली दधनेश्वर पायी दिंडीने शुक्रवारी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले.
लोकनेते स्व.मारुतराव घुले पाटील यांच्या पे्ररणेने सुरू झालेल्या पायी दिंडी सोहळ्याचे यंदाचे १३ वे वर्ष आहे. ज्येष्ठ नेते गुलाबराव घुले, डॉ.अरुण पवार, सरपंच डॉ.किरण पवार, रामनाथ राठी, शब्बीर शेख, राजाभाऊ पाऊलबुद्धे, प्राचार्य कारभारी नजन आदींच्या उपस्थितीत विठ्ठल नामाच्या जयघोषात दिंडीला ग्रामस्थांच्या वतीने निरोप देण्यात आला.
तालुक्यातील भावीनिमगाव, देवटाकळी, शहरटाकळी, खामगाव, जोहरापूर व त्यानंतर संध्याकाळी शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात दिंडी सोहळ्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर काळे महाराज यांचे कीर्तन झाले. यावेळी बाजार समितीचे सभापती गहिनीनाथ कातकडे, ज्येष्ठ संचालक बापूसाहेब गवळी, अश्विनी गवळी, संजय फडके, पुरुषोत्तम धूत, भगवान धूत, गोपीकिसन बलदवा, गणेश बोरा आदींनी दिंडीसोहळ्याचे स्वागत केले. या दिंडी सोहळ्यात ३०० हून अधिक वारकरी सहभागी झाले आहेत.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Departure of Dineshwarvindi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.