नरसिंह पैठणकरची विभागीय चौकशी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:20 IST2021-03-06T04:20:23+5:302021-03-06T04:20:23+5:30
अहमदनगर : प्रकल्पाचे बिल काढण्याच्या बदल्यात ठेकेदाराकडून आडीच लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या जाळ्यात सापडलेला नगरसिंह पैठणकर याची ...

नरसिंह पैठणकरची विभागीय चौकशी सुरू
अहमदनगर : प्रकल्पाचे बिल काढण्याच्या बदल्यात ठेकेदाराकडून आडीच लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या जाळ्यात सापडलेला नगरसिंह पैठणकर याची महापालिकेनेही विभागीय चौकशी सुरू केली आहे.
ठेकेदाराकडून लाच घेताना पैठणकर हा रंगेहात पकडला गेला. याप्रकरणी महापालिकेने त्याला निलंबित केले आहे. त्याच्या विभागीय चौकशीचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले असून, चौकशी अधिकारी म्हणून राजेंद्र मेहत्रे यांची नेमणूक करण्यात आली आहे. पैठणकर याने त्याच्या कार्यकाळात मंजूर झालेले प्रस्ताव, निघालेली बिले आणि प्रलंबित असलेल्या बिलांची तपासणी केली जाणार आहे. पैठणकर याच्या स्वाक्षरीमुळे कुठली बिले प्रलंबित होती. ती का प्रलंबित ठेवण्यात आली, याची संपूर्ण चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे. राजेंद्र मेहत्रे पैठणकर याच्या कार्यकाळातील अनियमिततेची चौकशी करून अहवाल सादर करणार असल्याचे सांगण्यात आले.
....
चौकशीच्या आदेशाने इतरांचे धाबे दणाणले
महापालिकेने पैठणकर यांची विभागीय चौकशी सुरू केली आहे. पैठणकर यांने जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवलेल्या बिलांची चौकशी करण्यात येणार असून, यामध्ये एकटा पैठणकर हाच दोषी आहे की आणखी कुणी हे समोर येणार आहे. त्यामुळे इतर अधिकाऱ्यांचे दाबे दणाणाले आहेत.