देवळाली पॅटर्न कोरोना औषध कोरोना रोखण्यासाठी अत्यंत प्रभावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:21 IST2021-05-07T04:21:56+5:302021-05-07T04:21:56+5:30
देवळाली पॅटर्नच्या या औषधीविषयी माहिती देताना आकीलबाबा यांनी सांगितले, गेल्यावर्षी कोरोनाचे आपल्या देशात आगमन झाले. तेव्हापासून या आजारापासून संपूर्ण ...

देवळाली पॅटर्न कोरोना औषध कोरोना रोखण्यासाठी अत्यंत प्रभावी
देवळाली पॅटर्नच्या या औषधीविषयी माहिती देताना आकीलबाबा यांनी सांगितले, गेल्यावर्षी कोरोनाचे आपल्या देशात आगमन झाले. तेव्हापासून या आजारापासून संपूर्ण मानवजातीला मुक्ती मिळावी म्हणून आम्ही आमच्या अनेक आयुर्वेदिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या मित्रांना एकत्रित करून आयुर्वेद व अध्यात्मचा संगम घालून रुग्णांना या आजरापासून मुक्ती देणारे औषध निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले. सुमारे २२२ हून अधिक वनस्पती एकत्रित करून त्याच्या विविध चाचण्या घेतल्या. सकारात्मक परिणाम जाणवला, तेव्हाच देवळाली पॅटर्नचे औषध सुरू केले आहे. या औषधीच्या माध्यमातून पैसे कमविणे हा हेतू मुळीच नाही. या औषधांचा अनेक कोविड सेंटरवर डॉक्टर उपयोग करीत असल्याचा दावा आकीलबाबा यांनी केला आहे. यावेळी गणेश भांड, डॉ. प्रशांत नालकर, मुसाभाई शेख, पप्पू पेरणे, शाकिर तांबोळी, अकबर शेख, हसन सय्यद आदी उपस्थित होते.
............
मी स्वतः डॉक्टर आहे. माझ्या ओपीडीला येणाऱ्या सुमारे दोनशेहून अधिक लोकांना या " देवळाली पॅटर्न कोरोना औषध" चा वापर करून ठणठणीत बरे केले आहेत. कोणत्याही अलोपॅथी औषधी न वापरता हे शक्य झाले आहे. अत्यंत दुर्मीळ अशा वनस्पती एकत्रित करून हे औषध बनविले आहे. या औषधाने पूर्णपणे कोरोनामुक्त होऊ शकतात.
- डॉ. प्रशांत नालकर,
चिंचविहिरे, राहुरी