श्रमिक शेतकरी संघटनेची निदर्शने
By | Updated: December 5, 2020 04:37 IST2020-12-05T04:37:40+5:302020-12-05T04:37:40+5:30
शेतकरी संघटनांशी चर्चा करताच घाईघाईने कृषी अध्यादेश काढण्यात आले. त्यानंतर त्यांचे कायद्यात रूपांतर करताना संसदेत चर्चा केली नाही. ...

श्रमिक शेतकरी संघटनेची निदर्शने
शेतकरी संघटनांशी चर्चा करताच घाईघाईने कृषी अध्यादेश काढण्यात आले. त्यानंतर त्यांचे कायद्यात रूपांतर करताना संसदेत चर्चा केली नाही. कोणत्याही शेतकरी संघटनेने मागणी केली नसताना शेतकरी हिताच्या नावाखाली कायदे शेतकऱ्यांच्या माथी मारण्यात आले. हे लोकशाही प्रक्रियेला धरून नाही अशी टीका यावेळी करण्यात आली. यावेळी दिल्ली येथील आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना आदरांजली वाहण्यात आली. राहुल दाभाडे, उत्तम माळी, बाबूलाल पठाण, भीमराज पठारे, जावेद पठाण, अश्रू माळी, अनिल बोरसे, रंगनाथ दुशिंग, मिठूभाई शेख, सुनील ठाकर, रामेश्वर मते, मल्हारी भोळे, भाऊसाहेब गागरे, राजमहमद जहागीरदार, शरीफ शेख आदी उपस्थित होते.
----
फोटो ओळी : ०४आंदोलन
श्रमिक शेतकरी संघटनेच्या वतीने वतीने कृषी कायद्यांविरोधात प्रांताधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली.