‘बाजीराव-मस्तानी’ विरोधात निदर्शने

By Admin | Updated: December 18, 2015 23:16 IST2015-12-18T23:13:50+5:302015-12-18T23:16:13+5:30

अहमदनगर : बाजीराव-मस्तानी चित्रपटावर आक्षेप घेत कार्यकर्त्यांनी शहरातील पाईपलाईन रोडवरील माय सिनेमा चित्रपटगृहात निदर्शने केली़

Demonstrations against 'Bajirao-Mastani' | ‘बाजीराव-मस्तानी’ विरोधात निदर्शने

‘बाजीराव-मस्तानी’ विरोधात निदर्शने

अहमदनगर : वादंगामुळे गाजत असलेल्या संजय लिला भन्साळी यांच्या बाजीराव-मस्तानी चित्रपटावर आक्षेप घेत शुक्रवारी अखिल भारतीय ब्राम्हण युवा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी शहरातील पाईपलाईन रोडवरील माय सिनेमा चित्रपटगृहात निदर्शने केली़ यावेळी चित्रपटगृहात एकही शो दाखवू नये, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली़
बाजीराव-मस्तानी चित्रपटातील काही दृश्य व गाण्यांवर गेल्या महिनाभरापासून आक्षेप घेतले जात होते़ काही संघटनांनी या चित्रपटाला थेट विरोध करत आंदोलन करण्याचाही इशारा दिला होता़ चित्रपटामुळे निर्माण झालेल्या वादामुळे शहरात पोलिसांनी सकाळी आशा चित्रपटगृह परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात केला होता़ अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाच्या कार्यकर्त्यांनी मात्र, माय सिनेमा चित्रपटगृहात दुपारी १२ वाजता ‘बाजीराव-मस्तानी’चा शो सुरू होताच आंदोलन केले़ यावेळी तेथे पोलीस बंदोबस्त नव्हता़ चित्रपटगृह व्यवस्थापकांनी विनंती केल्यानंतर हे आंदोलन थांबविण्यात आले़ या आंदोलनात संघाचे शहराध्यक्ष मयूर जोशी, कृष्णा जोशी, जयंत अडकर, विलास भोपळे, अमित पालके, चैतन्य मडके, प्रसन्न बिडकर, विजय मराठे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते़
(प्रतिनिधी)
बाजीराव-मस्तानी या चित्रपटात बाजीराव पेशवे यांच्याबद्दलचा इतिहास बदलून काल्पनिक घटना दाखविण्यात आल्या आहेत. यामध्ये वास्तव बाजूला ठेवून चित्रपट रंजक करण्याच्या प्रयत्नात इतिहासाचे विकृतीकरण करण्यात आले आहे. मराठेशाहीसाठी पेशव्यांनी दिलेल्या योगदान व पराक्रमाकडे चित्रपटात दुर्लक्ष करण्यात आले आहे. यामुळे बाजीराव पेशवा यांचा अपमान झाला असल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे़

Web Title: Demonstrations against 'Bajirao-Mastani'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.