काँगे्रस, मनसेकडून दानवेंचा निषेध
By Admin | Updated: May 12, 2017 15:32 IST2017-05-12T15:32:05+5:302017-05-12T15:32:05+5:30
रावसाहेब दानवे यांच्या शेतकरी विरोधी वक्त्याच्या निषेधार्थ शुक्रवारी नगरमध्ये काँगे्रस, मनसेकडून आंदोलन करण्यात आले़

काँगे्रस, मनसेकडून दानवेंचा निषेध
आॅनलाईन लोकमत
अहमदनगर, दि़ १२ - रावसाहेब दानवे यांच्या शेतकरी विरोधी वक्त्याच्या निषेधार्थ शुक्रवारी नगरमध्ये काँगे्रस, मनसेकडून आंदोलन करण्यात आले़ काँगे्रसने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले़ यावेळी बाळासाहेब भुजबळ, बाळासाहेब भंडारी, आऱ आऱ पिल्ले, शाम वाघस्कर, सविता मोरे, साहिल शेख, गौरव ढोणे, मनोज सत्रे आदी उपस्थित होते़
मनसेने दिल्लीगेट वेशीवर दानवे यांचा प्रतिकात्मक पुतळा लटकवून शाईफेक आंदोलन केले़ यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, गिरीश जाधव, नितीन भुतारे, तुषार हिरवे, अशोक दातरंगे, अभिषेक मोर, परेश पुरोहित, प्रज्वल वाकळे, दिपक दांगड, सुमित वर्मा आदी उपस्थित होते़
पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे शिवसेनेच्यावतीने दानवे यांचा निषेध करण्यात आला़ शिवसेनेचे तालुकाध्यक्ष रफिक शेख यांनी दानवेंना सत्तेची नशा चढल्याचे सांगत दानवेंच्या राजीनाम्याची मागणी केली़ यावेळी अशोक अकोलकर, जालिंदर वामन, बाबा गाडेकर, गजानन गायकवाड, सुनिल अकोलकर आदी उपस्थित होते.
सामनाची होळी
राज्यात दानवे यांच्याविरोधात शिवसेना रस्त्यावर उतरल्यानंतर भाजपानेही आक्रमक पवित्रा घेतला आहे़ शुक्रवारी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकाची नगरमध्ये होळी केली़ त्यामुळे आता शिवसेना विरूद्ध भाजप असा संघर्ष थेट रस्त्यावर दिसू लागला आहे़