१० हजार रुपयांच्या लाचेची मागणी : पोलीस पाटलाविरोधात शिर्डीत गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 16:46 IST2018-09-14T16:45:48+5:302018-09-14T16:46:06+5:30
अदखलपात्र गुन्ह्यात पकडून न नेण्याकरीता तसेच प्रकरण मिटून घेण्यासाठी कोपरगाव तालुक्यातील वेस गावातील पोलीस पाटलाने १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी तक्रारदाराकडे केली होती.

१० हजार रुपयांच्या लाचेची मागणी : पोलीस पाटलाविरोधात शिर्डीत गुन्हा दाखल
अहमदनगर : अदखलपात्र गुन्ह्यात पकडून न नेण्याकरीता तसेच प्रकरण मिटून घेण्यासाठी कोपरगाव तालुक्यातील वेस गावातील पोलीस पाटलाने १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी तक्रारदाराकडे केली होती. लाचेची मागणी केल्याप्रकरणी पोलीस पाटील शरद हरिषचंद्र खंडीझोड याच्याविरोधात शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीसांनी आरोपींनी अटक केली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच मागणी पडताळणीची कारवाई केली. पोलीस उपअधीक्षक किशोेर चौधरी, पोलीस निरीक्षक श्याम पवरे, पोलीस निरीक्षक दीपक करांडे यांनी कारवाई केली.