उत्पन्नाची अट रद्द करण्याची मागणी
By | Updated: December 7, 2020 04:14 IST2020-12-07T04:14:35+5:302020-12-07T04:14:35+5:30
अहमदनगर : हयातीच्या दाखल्याबरोबर संजय गांधी, श्रावणबाळ निराधार योजनेतील लाभार्थ्यांना पन्नास हजार रुपये उत्पन्नाचा दाखला देण्याचे अनिवार्य करण्यात आले ...

उत्पन्नाची अट रद्द करण्याची मागणी
अहमदनगर : हयातीच्या दाखल्याबरोबर संजय गांधी, श्रावणबाळ निराधार योजनेतील लाभार्थ्यांना पन्नास हजार रुपये उत्पन्नाचा दाखला देण्याचे अनिवार्य करण्यात आले आहे. हा दाखला दिला तरच त्यांना मदत मिळणार आहे. ही अट रद्द करण्याची मागणी सावली दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे व बाहुबली वायकर यांनी आ. निलेश लंके यांच्याकडे केली आहे.
या योजनेसाठी लागणाऱ्या उत्पन्नाच्या दाखल्यासाठी अनेक तलाठी कमी उत्पन्न दाखला देण्यास टाळाटाळ करतात. ज्यांना कमी उत्पन्नाचा दाखला मिळतो तो सर्कल चौकशीमध्ये रद्द होतो. अशा अनेक अडचणी सध्या सुरू आहेत. या नियमामुळे अनेक लाभार्थ्यांचे अनुदान बंद होणाच्या मार्गावर आहे. या अनुदानावरच कित्येक लाभार्थी आपला उदरनिर्वाह करतात. अनुदान बंद झाल्यास त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर होणार आहे. त्यामुळे उत्पन्न दाखल्याची जाचक अट रद्द करावी. या निवेदनाची दखल घेत आ. लंके यांनी येत्या हिवाळी अधिवेशनात सदरचा प्रश्न मांडणार असल्याचे आश्वासन दिले.
---------
दरवर्षी उत्पन्नाचा दाखला देण्याची अट म्हणजे गोरगरीब, निराधार, दिव्यांग यांच्या अनुदानावर गदा आणण्याचा प्रकार शासन करीत आहे. ही जाचट अट त्वरित रद्द करावी, अन्यथा दिव्यांग बांधवांच्या वतीने राज्यस्तरावर आंदोलन छेडले जाणार आहे.
-बाबासाहेब महापुरे, अध्यक्ष, सावली दिव्यांग कल्याणकारी संस्था
--------------
फोटो- ०१ संजय गांधी योजना
संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला देण्याची अट रद्द करण्याची मागणी सावली दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे, बाहुबली वायकर यांनी आ. निलेश लंके यांच्याकडे केली.