पेट्रोल, डिझेल दरवाढ कमी करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:37 IST2021-02-06T04:37:14+5:302021-02-06T04:37:14+5:30

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेलच्या किमती सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या ट्रान्सपोर्ट दरामध्ये वाढ होवून सर्व ...

Demand for reduction in petrol and diesel prices | पेट्रोल, डिझेल दरवाढ कमी करण्याची मागणी

पेट्रोल, डिझेल दरवाढ कमी करण्याची मागणी

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेलच्या किमती सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या ट्रान्सपोर्ट दरामध्ये वाढ होवून सर्व वस्तू नागरिकांना महागाईने घ्याव्या लागतात. आधीच कोरोना महामारीमुळे व्यवसाय बंद पडले. अनेकांच्या हातचे काम गेले. खासगी नोकऱ्या अनेकांना गमवाव्या लागल्या. त्यामुळे नागरिक आर्थिक अडचणीत आले आहेत. अशातच सरकार पेट्रोल व डिझेलची सातत्याने दरवाढ करीत आहेत. हिंदू एकता आंदोलन पक्षाने याआधीही अनेकवेळा ही दरवाढ कमी करून पेट्रोल व डिझेलचे दर स्थिर ठेवावेत, अशी मागणी केली होती. मात्र, शासन याकडे दुर्लक्ष करून या दरवाढीला पायबंद घालण्याऐवजी अधून-मधून दरवाढ होतच आहे. त्यामुळे सामान्य नागरिक मेटाकुटीस आला आहे. पेट्रोल व डिझेलची ही होणारी दरवाढ कमी करून भाव स्थिर ठेवावेत, अशी मागणी हिंदू एकता आंदोलन पक्षाने केली आहे.

याबाबत तहसीलदार, प्रांताधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांना लवकरच निवेदन देण्यात येणार असल्याचेही हिंदू एकता आंदोलन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन आण्णा शितोळे, शहराध्यक्ष मंगेश छतवाणी, ॲड. राजाभाऊ देशपांडे, मनोहर बागुल, चिलिया तुवर, अमिरभाई जहागीरदार, वसंत गायकवाड, विजय जगताप, नागनाथ डोंगरे, बाळासाहेब जाधव, शिवाजी फोफसे, जयराम क्षीरसागर, बाळासाहेब आगळे, अविनाश कनगरे, सोमनाथ जगताप, गुरु भुसाळ, संजय ढगे, वसंतराव धंदक यांनी एका पत्रकाद्वारे सांगितले.

Web Title: Demand for reduction in petrol and diesel prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.