ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्याची मागणी
By Admin | Updated: August 12, 2014 23:18 IST2014-08-12T22:59:23+5:302014-08-12T23:18:58+5:30
कुकडी प्रकल्पातील ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यात यावे, अन्यथा तालुका भाजपाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपाचे तालुकाध्यक्ष अशोक खेडकर यांनी निवेदनाव्दारे दिला आहे.

ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्याची मागणी
अहमदनगर: कर्जत तालुक्यात अत्याल्प पाऊस झाला असून, कुकडी प्रकल्पातील ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यात यावे, अन्यथा तालुका भाजपाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपाचे तालुकाध्यक्ष अशोक खेडकर यांनी निवेदनाव्दारे दिला आहे.
कर्जत तालुक्यातील गावांत भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून, कुकडी प्रकल्पातील ओव्हरफ्लोचे पाणी सोडावे, यामागणीसाठी भाजपाचे कर्जत तालुकाध्यक्ष अशोक खेडकर यांच्यासह शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अनिल कवडे यांची भेट घेतली़ यावेळी दिलेल्या निवेदनात तालुक्यात अत्यंत कमी पाऊस झाला आहे़तालुक्यावर दुष्काळाची छाया आहे़त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे
़सध्या कुकडी प्रकल्प पाणलोटक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असून, धरणे ८० टक्के भरली आहेत़ या प्रकल्पातून सध्या पाणी सुरू आहे़
तालुक्यातील राशीन, डी़वाय़ चारी, कोपर्डी, बारडगाव, राक्षसवाडी, येसवडी, चिलवडी, करपडी, अळसुंदे, माळंगी, निंबे, शेगुड, डोंबाळवाडी, खातगाव, लोणीमसदपूर, जळकेवाडी, गलांडवाडी, बजरंगवाडी, चापडगाव या गावांतील पाझर तलाव पाण्याने भरून घ्यावेत, ते भरल्यास परिसरात पाणीटंचाई भासणार नाही़ त्यामुळे तालुक्यातील वरील गांवात तातडीने पाणी सोडण्यात यावे, अन्यथा तालुका भाजपाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद आहे़ (प्रतिनिधी)