संगमनेरमध्ये कोतवालांचे भिक मांगो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 15:49 IST2018-12-25T15:48:06+5:302018-12-25T15:49:02+5:30

राज्य सरकारच्या चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांमध्ये समावेश व्हावा या मागणीसाठी संगमनेर तालुक्यातील कोतवालांनी घारगावच्या आठवडे बाजारात ‘भिक मांगो’ असे अनोखे आंदोलन केले.

 Demand for Kotwala's movement in Sangamner | संगमनेरमध्ये कोतवालांचे भिक मांगो आंदोलन

संगमनेरमध्ये कोतवालांचे भिक मांगो आंदोलन

घारगाव : राज्य सरकारच्या चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांमध्ये समावेश व्हावा या मागणीसाठी संगमनेर तालुक्यातील कोतवालांनी घारगावच्या आठवडे बाजारात ‘भिक मांगो’ असे अनोखे आंदोलन केले.
गावोगावी असणा-या कोतवालांना सध्या केवळ मानधनावरच काम करावे लागत आहे. हे मिळत असलेले पाच हजार रुपये मानधन अतिशय कमी असल्याने या सर्व कोतवालांचा शासनाच्या चतुर्थ श्रेणीत समावेश करावा या मागणीसाठी नाशिक येथे छत्तीस दिवसापासून आंदोलन सुरू आहे. दरम्यान या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी संगमनेर तालुक्यातील कोतवालांनी आज घारगाव येथे आठवडे बाजारात भिक मांगो आंदोलन केले.

Web Title:  Demand for Kotwala's movement in Sangamner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.