शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

जामखेडमधील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या दुहेरी हत्याकांडाचा तपास एटीएसकडे द्यावा - दिलीप वळसे यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 20:00 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते योगेश राळेभात व राकेश ऊर्फ रॉकी राळेभात या दोघांची २८ एप्रिल रोजी हत्या झाली. तीन महिन्यांपूर्वी भरदिवसा रस्त्यात झालेल्या गोळीबारात दोघेजण गंभीर जखमी झाले. या दोन्ही घटना पाहता घटनेतील आरोपी सत्तारूढ पक्षाशी संबंधित आहे. जामखेड येथे तीन वर्षांत बारा पोलीस अधिकारी बदलले. यावरून घडलेल्या घटनेचा तपास कार्यक्षमपणे पोलीस करू शकणार नाहीत. त्यामुळे राळेभात बंधुच्या हत्याकांडाचा तपास एटीएसमार्फत करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे यांनी केली.

जामखेड : राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते योगेश राळेभात व राकेश ऊर्फ रॉकी राळेभात या दोघांची २८ एप्रिल रोजी हत्या झाली. तीन महिन्यांपूर्वी भरदिवसा रस्त्यात झालेल्या गोळीबारात दोघेजण गंभीर जखमी झाले. या दोन्ही घटना पाहता घटनेतील आरोपी सत्तारूढ पक्षाशी संबंधित आहे. जामखेड येथे तीन वर्षांत बारा पोलीस अधिकारी बदलले. यावरून घडलेल्या घटनेचा तपास कार्यक्षमपणे पोलीस करू शकणार नाहीत. त्यामुळे राळेभात बंधुच्या हत्याकांडाचा तपास एटीएसमार्फत करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे यांनी केली.

योगेश राळेभात व राकेश राळेभात यांच्या कुटुंबियांचे सात्वंन केल्यानंतर वळसे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे. त्यांना मिळाला पाहिजे अशी कुटुंबाची भूमिका आहे. यासाठी जे करावे लागेल ते पक्ष म्हणून स्थानिक, राज्य पातळीवरील करण्यास आम्ही तयार आहोत. दोन्ही कुटुंबीयांतील एकाला आमच्या संस्थेत नौकरी देऊ. २८ एप्रिल रोजी घडलेल्या घटनेचा आढावा घेतला असून त्यादिवशी या जखमींवर ग्रामीण रुग्णालयात तातडीने उपचार झाले असते तर ते वाचले असते. त्यांना १०८ अम्ब्युलन्समध्ये नगरला घेऊन जावे लागते. त्यांना सुरवातीला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणे गरजेचे असताना खाजगी हॉस्पिटल मध्ये नेले तसेच अहमदनगर सारख्या शहरात शवविच्छेदन करण्याची सोय नाही का? मृतदेह पर जिल्ह्यात घेऊन जावे लागतात हे संशयास्पद आहे.गृहराज्यमंत्री दिपक केसरकर जिल्ह्यात येऊन पोलीस अधीक्षकांकडून आढावा घेतात व जामखेडची घडलेली घटना पाणी मारण्याच्या कारणांवरून झालेली आहे. ती राजकीय नाही असे बेजबाबदार विधान करतात. जामखेडची कायदा व सुव्यवस्था परिस्थिती काय आहे हे पत्रकार वारंवार लिहीतात, ही कात्रणे माझ्याकडे आहेत. शहर व तालुक्यात अवैध धंदे वाढले आहेत. सावकारकी मोठ्या प्रमाणावर होत असून काही वेगळ्या घटना घडत आहेत. वाळू तस्करी होत आहे. या सर्वांना राजाश्रय कोणाचा आहे? खरे जबाबदार केंव्हा पुढे येतील. तालुका व जिल्ह्यातील महसूल यंत्रणा शिथील झाल्याचा आरोप वळसे यांनी केला.राळेभात बंधुच्या घटनेचे मूळ तालीम आहे. तेथे गुन्हेगार तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाते अशी माहिती पोलीस अधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडून मिळाली आहे. पोलिसांनी तालुक्यातील वाकी येथील घटना गांभीयार्ने घेतली असती तर कदाचित ही घटना घडली नसती, असे सांगून वळसे म्हणाले, जामखेड शहर व तालुका शांत व सहनशील आहे. शहराला बारा, बारा दिवस पाणी मिळाले नाही तरी लोकांचा उद्रेक होत नव्हता. शहर व तालुक्यात बाहेरील राज्यातील टोळ्या आल्या आहेत. गावठी कट्टा घेऊन ते सक्रिय आहेत. तालुक्यातील या टोळ्यांचा नायनाट होणे गरजेचे असून त्यादृष्टीने पोलीस यंत्रणेने काम केले पाहिजे. नगर येथील हत्याकांडात केडगाव येथे ६०० लोकांवर गुन्हा दाखल होऊन कोणालाच अटक केली जात नाही. तर दुस-या गुन्ह्यातील आरोपींना अटक केली जाते. पोलीस दबावाखाली काम करीत आहेत. पोलीस प्रशासनाकडून थातूरमातूर उत्तरे दिली जातात. पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात एकापेक्षा जास्त घटना घडत असतील व ते न्याय देऊ शकत नसेल तर त्यांनी मंत्रिमंडळातील राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी वळसे यांनी केली.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे, किसनराव लोटके, राष्ट्रवादीच्या महीला जिल्हाध्यक्ष मंजुषा गुंड, महीला प्रदेश उपाध्यक्ष शारदा लगड, बाजार समितीच्या उपसभापती शारदा भोरे, प्रदेश संघटक राजेंद्र कोठारी, युवक प्रदेश सरचिटणीस डॉ. भास्करराव मोरे, जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय वारे, प्रा. मधुकर राळेभात, शहाजी राळेभात, हनुमंत पाटील, शरद भोरे, नगरसेवक अमित जाधव, शरद शिंदे, आदी उपस्थित होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेडPoliceपोलिसNCPराष्ट्रवादी काँग्रेसKedgoan double murderकेडगाव दुहेरी हत्याकांड