काकडी, कैरी, भेंडी, लिंबुला मागणी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:20 IST2021-03-15T04:20:29+5:302021-03-15T04:20:29+5:30

अहमदनगर : उन्हाळा सुरू झाल्याने भाज्यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे भाज्यांचे भाव वाढले आहेत. आवक वाढल्याने पालेभाज्यांच्या दरात ...

Demand for cucumber, curry, okra and lemon increased | काकडी, कैरी, भेंडी, लिंबुला मागणी वाढली

काकडी, कैरी, भेंडी, लिंबुला मागणी वाढली

अहमदनगर : उन्हाळा सुरू झाल्याने भाज्यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे भाज्यांचे भाव वाढले आहेत. आवक वाढल्याने पालेभाज्यांच्या दरात मात्र घसरण झाली आहे. काकडी, कैरी, लिंबू, भेंडी, कारले, दोडके,गवारीला मागणी वाढल्याने त्यांचे दरही कडाडले आहेत. उन्हाळा सुरू झाल्याने सरबतासाठी लिंबाला मागणी वाढली आहे, तर कांद्यात कमालीची घसरण झाली आहे.

रविवारी नगर येथील बाजार समितीमध्ये भाज्यांची आवक घटल्याचे दिसले. उन्हाळ्याची तीव्रता सुरू झाल्याने भाज्यांची आवकही आता कमी कमी होत जाणार आहे. त्याची सुरूवात बाजारात दिसून आली आहे. गवारीने सर्वात जास्त भाव खाल्ला आहे. रविवारी बाजारात असलेले भाज्यांचे दर असे होते. (रुपये प्रति क्विंटल)- टोमॉटो (८००),वांगी (१०००), फ्लावर (२०००),कोबी (५००), काकडी (२०००), गवार (८०००), घोसाळे (३०००), दोडका(३०००), कारले (३०००), कैरी (३०००), भेंडी (३५००), वाल (२५००), घेवडा (२०००), बटाटे (१२००), लसूण (७०००), हिरवी मिरची (३५००), शेवगा (२०००), लिंबू (४५००),गाजर (१२००), भोपळा (१०००), वटाणा (३२००), कांदा (१७००).

----------

पालेभाज्यांमध्ये घसरण (दर रुपये प्रति शंभर गड्डी)

मेथी (५००), कोथंबीर (५००), पालक (५००), शेपू (६००), मुळे (७००), हरभरा (८००),

-------

डाळिंबाचे भाव वाढले

बाजारात पुन्हा एकदा डाळिंबाचे भाव वाढले आहेत. सफरचंदला १२ हजार रुपये प्रतिक्विंटल तर डाळिंबाला १५ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. त्यामुळे फळात डाळिंब हेच सर्वात महागडे फळ झाले आहे. मोसंबी (७०००), संत्रा (६५००), पपई (१५००), रामफळ (३०००), चिकू (१८००), द्राक्षे (४०००), अंजिर (६०००),कलिंगड (१०००) खरबूज (२०००) असे प्रति क्विंटल दर आहेत.

-----------

Web Title: Demand for cucumber, curry, okra and lemon increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.