बीओटी तत्त्वावर शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:15 IST2021-07-02T04:15:26+5:302021-07-02T04:15:26+5:30

अहमदनगर शेवगाव येथील जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र व पंचायत समिती आवारात बीओटी तत्त्वावर शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्याची ...

Demand for construction of shopping complex on BOT principle | बीओटी तत्त्वावर शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्याची मागणी

बीओटी तत्त्वावर शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्याची मागणी

अहमदनगर शेवगाव येथील जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र व पंचायत समिती आवारात बीओटी तत्त्वावर शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान, टपरीधारकांनीही याच मागणीसाठी गुरुवारी जिल्हा परिषद आवारात उपोषण केले.

याबाबत दिलेल्या निवेदनात हर्षदा काकडे यांनी म्हटले आहे की, शेवगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (मुलांची), प्राथमिक आरोग्य केंद्र व पंचायत समिती आवारात २०१७ च्या प्रस्तावानुसार बीओटी तत्त्वावर शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधावे. दरम्यान, जोपर्यंत कार्यवाही पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण करण्याचा निर्धार टपरीधारकांनी केला होता. याबाबत काकडे यांच्याशी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी चर्चा करून कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले. त्यामुळे टपरीधारकांनी उपोषण मागे घेतले. या उपोषणात शेवगाव नगर परिषदेचे नगराध्यक्ष विनोद मोहिते, जनशक्ती विकास आघाडीचे शहराध्यक्ष सुनील काकडे, संजय गुजर, अरविंद पटेल, विष्णू पाठे, रोहिदास गांगे, किशोर गरडवाल, कादर मनियार, सिराज शेख, संदीप राऊत, मोहंमद रफिक तांबोळी, बबलू तांबोळी, राजू वाकळे, भाऊसाहेब भाग्यवंत, रणजीत शेळके, राधेश्याम मुंदडा, ज्ञानदेव सोनवणे, मधुकर वणवे, बबन घुगे, प्रल्हाद कांबळे आदी टपरीधारक उपस्थित होते.

--

फोटो-०१ हर्षदा काक़डे

Web Title: Demand for construction of shopping complex on BOT principle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.