नगर जिल्ह्यातील पासपोर्टला विलंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 18:37 IST2018-12-19T18:37:08+5:302018-12-19T18:37:18+5:30
सुमारे आठ महिन्यापूर्वी नगरमध्ये सुरु झालेल्या पासपोर्ट सेवा केंद्रामुळे नगरकरांना पुण्याचे हेलपाटे वाचले़ मात्र, अपडेशनचे काम रेंगाळत असल्यामुळे पासपोर्ट मिळण्यास विलंब होत आहे़ त्या

नगर जिल्ह्यातील पासपोर्टला विलंब
अहमदनगर : सुमारे आठ महिन्यापूर्वी नगरमध्ये सुरु झालेल्या पासपोर्ट सेवा केंद्रामुळे नगरकरांना पुण्याचे हेलपाटे वाचले़ मात्र, अपडेशनचे काम रेंगाळत असल्यामुळे पासपोर्ट मिळण्यास विलंब होत आहे़ त्यामुळे अर्जदारांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली असून, पासपोर्टचे काम जलद व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे़
नगरमधील मुख्य पोस्ट कार्यालयात पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करण्यात आले आहे़ त्यामुळे नगरकरांना पुण्याला जाण्याचे हेलपाटे वाचले असून, आॅनलाईन अर्ज केल्यानंतर एका दिवसात नगरमधील पासपोर्ट सेवा केंद्रात सबमीशन होते़ नगरमधून सर्वांचे अर्ज पुण्याला पाठविले जातात़ पुण्यात एका खासगी कंपनीकडून सर्व अर्जांची छानणी केली जाते़ त्यानंतर आवश्यक डाक्युमेंट स्कॅन करुन अपलोड केले जातात़ सुमारे १५ दिवसात पोलीस व्हेरिफिकेशन होते़ नंतर संबंधित अर्जदाराला पासपोर्ट घरपोहोच पाठविला जातो़ दरम्यान पुण्यात अपडेशनचे काम रेंगाळते़ त्यामुळे नगरहून गेलेल्या अर्जावर पुढील कार्यवाही उशीरा होते आणि अर्जदारांना पासपोर्ट मिळण्यास विलंब होतो़ अपडेशनची प्रक्रिया जलद व्हावी, अशी अपेक्षा अर्जदारांकडून व्यक्त करण्यात येत आहे़
मी १८ आॅक्टोबरला पासपोर्टसाठी आॅनलाईन नोंदणी केली़ मात्र, अद्याप पोलीस व्हेरिफिकेशन झाले नाही़ याबाबत पासपोर्ट सेवा केंद्रात चौकशी केली़ त्यांनी दिलेल्या ई-मेलवर मी तक्रार केली़ पण अजून कार्यवाही झालेली नाही़
-प्रमोद राधाजी बारस्कर